Shiv Sena UBT : ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबीयांना दिला AB फॉर्म, पण उमेदवार ठेवला गुलदस्त्यात
Uddhav Thackeray, Ghosalkar Family AB Form : ठाकरेंनी काही उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप केले आहे. यामध्ये दहिसरमधून ठाकरेंनी घोसाळकरांना AB फॉर्म दिला आहे. पण उमेदवार जाहीर केला नाही आहे. याउलट घोसाळकर कुटुंबियांनाच कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं याचा अधिकार दिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ठाकरेंकडून घोसाळकर कुटुंबीयांना AB फॉर्म सूपूर्द
AB फॉर्मवर उमेदवाराचं नावच टाकलं नाही
ठाकरे गटाकडून दहिसरमधून कोण लढणार?
Uddhav Thackeray, Ghosalkar Family AB Form : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत तीनच उमेदवारांची नावे आहेत. आणि आतापर्यंत ठाकरेंनी 83 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यासह ठाकरेंनी काही उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप केले आहे. यामध्ये दहिसरमधून ठाकरेंनी घोसाळकरांना AB फॉर्म दिला आहे. पण उमेदवार जाहीर केला नाही आहे. याउलट घोसाळकर कुटुंबीयांनाच कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं याचा अधिकार दिला आहे. (uddhav thackeray ab form to ghosalkar family of dahisar assembly constituency but candidate not decided tejaswi ghosalkar and vinod ghosalkar and manisha choudhari)
ADVERTISEMENT
दहीसरमध्ये काही महिन्यापूर्वी फेसबूक लाईव्ह करून ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता त्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीकडे उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिला आहे. पण या एबी फॉर्मवर ठाकरेंनी फक्त घोसाळकर नाव लिहलं आहे. पण नेमकी कोणाला निवडणूक लढवायची आहे, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबीयांना दिला आहे. 'निवडणूक कोणी लढवायची हे तुम्ही ठरवा. तुमच्या कुटुंबात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर मला याबाबत काहीही बोलायचं नाही. निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार तुमचा आहे', अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबीयांसमोर मांडली आहे.
हे ही वाचा : BJP 2nd Candidates List: भाजपची दुसरी यादी आली समोर, अनेकांना मोठा धक्का
दहीसर मतदारसंघातून दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी आणि त्यांचे सासरे माजी आमदार विनोद घोसाळकर दोघेही निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी आणि पिता विनोद घोसाळकरांमध्ये रस्सीखेच असणार आहे. तसेच एका तासात ठरवा कोणाला द्यायची उमेदवारी ती आणि ते नाव टाका अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे घोसाळकर कुटुंब आता तेजस्वी घोसाळकर की विनोद घोसाळकर या दोघांपैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे वाचलं का?
यंदा दहिसरमध्ये भाजपच्या मनिषा चौधरी आणि घोसाळकर यांच्यात थेट लढत होणार आहे. मनिषा चौधरी यांच्याविरोधात तेजस्वी घोसाळकर की विनोद घोसाळकर, या दोघांपैकी कोणता उमेदवार असणार आहे? याचा निर्णय आता घोसाळकर कुटुंबियांना घ्यायचा आहे.
हे ही वाचा : Shiv Sena UBT Candidates List: ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, कुणाकुणाला मिळाली संधी?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT