Ajit Pawar Exclusive: 'मविआ लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये देणार', अजित पवारांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान

point

लाडकी बहीण योजनेबाबत पवार नेमकं काय म्हणाले?

point

"सरकारला 75 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार..."

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. अशातच युती-आघाडीकडून नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून मविआने महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महाविकास आघाडीने 3000 हजार रुपये देण्याचं जाहीर केलं, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई तकच्या मुलाखतीत मोठी प्रतिक्रिया दिली. 

ADVERTISEMENT

अजित पवार नेमकं काय म्हणाले? 

लाडकी बहीण योजनेसाठी महाविकास आघाडीने 3000 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलंय. 4 लाख रुपये बरोजगारांना भत्ता म्हणून देणार आहेत. 25 लाख विमा संरक्षणही देण्यात आलं आहे. तुम्हीही घोषणा केल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत नेमकी काय स्पर्धा सुरु आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "ही गोष्ट खरी आहे. मागच्या वेळेस आम्ही अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळी या सर्व योजना देत असताना सरकारला 75 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलावा लागत होता. साडेसहा लाख कोटींचं बजेट होतं. त्यामध्ये 75 हजार कोटी रुपये या सर्व गोष्टींसाठी होते. मुलींचं मोफत शिक्षण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दीड हजार रपये, वीज माफीसाठी 15 हजार कोटी रुपये लागत होते.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: ' अमित शाह लगे रहो मुन्नाभाईच्या सर्कीटसारखं...', सांगोल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

बारावी, डिप्लोमा डिग्री आणि शिक्षणार्थींना 8 हजार कोटी रुपये, तीन गॅस सिलेंडर योजनेसाठी 2 हजार कोटी रुपये होत होते, दुधाचं इन्सेनटिव्ह 7 रुपये, या सर्वांसाठी मला 75 हजार कोटी रुपये लागत होते. त्यावेळी त्यांनी (विरोधक) आमच्यावर आरोप केले की, यांनी राज्याला दिवाळखोरीत काढलं. राज्य कर्जबाजारी केलं. यांच्याकडे पैसे कुठून आले? हे आता पगार थांबवतील. बिलं थांबवतील. केलेल्या कामाची बिलं मिळणार नाहीत. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं विरोधकांनी आरोप केलं".

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Amit Shah : "आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर...", अमित शाह 'हे' काय बोलून गेले

"आम्हाला अडीच कोटी महिलांना दीड हजाराप्रमाणे 45 हजार कोटी रुपये लागतात. पण पत्रकारांनी त्यांना विचारलं की 3 लाख कोटींचं नियोजन तुम्ही कसं केलं आहे? यावर ते म्हणाले हे आमचं गुपित आहे. आम्ही आता सर्वांना सांगणार नाही. सरकारमध्ये आल्यावर सांगू. ही निव्वळ धुळफेक आहे. लोकांना फसवण्याचं काम आहे. हे अजिबात होऊ शकत नाही. आम्ही 75 कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतला, त्यावेळी 15 हजार कोटी रुपये आम्हाला वीजमाफीला लागले. पाच महिन्याचे साडेसात हजाराप्रमाणे पैसे त्यांना दिले आहेत. गॅस सिलेंडरचाही पहिला हफ्ता गेला आहे. माझी लाडकी बहीण योजना फार लोकप्रीय झाली. त्यामुळे महिलांना पुन्हा आपलसं करण्यासाठी त्यांनी हे केलेलं दिसतंय. पुढे आपण येऊच शकणार नाही म्हणून वाटेल ते जाहीर करा. लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम ते करत आहेत, असंही अजित पवार म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT