Ajit Pawar Property : ट्रॅक्टर, ट्रेलर गाडी ते सोनं-चांदी... अब्जाधीश अजितदादांच्या संपत्तीमध्ये काय काय?

मुंबई तक

Ajit Pawar Net Worth: सोनं, जमीन, गाड्या आणि गुंतवणुकीच्या रकमेसह अजित पवार यांच्या एकूण संपत्तीचा आकडा हा तब्बल 125 कोटींपर्यंत जातो.

ADVERTISEMENT

अजित पवार यांची प्रॉपर्टी
अजित पवार यांची प्रॉपर्टी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांची संपत्ती किती?

point

अजित पवारांच्या संपत्तीत कशाकशाचा समावेश?

point

सुनेत्रा पवार यांच्याकडे किती किलो सोनं?

Ajit Pawar Property मुंबई : यंदाची विधानसभा निवडणूक ही बारामतीमध्ये होणाऱ्या लढतीमुळे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार असं काका पुतण्यांतला कलह राज्यासमोर आला. त्यानंतर आता निवडणुकीत दोघांनाही स्वत:ला सिद्ध करण्याचं आवाहन असणार आहे. याच निवडणुकीसाठी अजित पवार यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्राच्या माध्यमातून त्यांची संपत्ती समोर आली. यावेळी त्यांच्याकडे 7 लाख रोख, 3 कोटी डिपॉझिट्ससह तीन वाहनं असल्याचं समोर आलंय. तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडेही तब्बल दीड कोटी सोनं असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अजित पवार यांच्या एकूण संपत्तीचा आकडा हा तब्बल 125 कोटींपर्यंत जातो. (Ajit Pawar net worth according to election commission affidavit)

हे ही वाचा >>Amit Thackeray : पत्नी आणि मुलाच्या नावावर लाखो रुपये, सोनं; अमित ठाकरेंच्या नावावर किती कोटींची संपत्ती?

 


Cash with Ajit Pawar:अजित पवार यांची संपत्ती

रोख

7 लाख 20 हजार रोख

सुनेत्रा पवार यांच्याकडे 6 लाख 65 हजार रोख


Ajit Pawar Bank Details:बँक डिपॉझिट्स

अजित पवार : 3 कोटी 09 लाख 69हजार 53 रुपये.

सुनेत्रा पवार : 3 कोटी 69 लाख 92 हजार 91 रुपये.

 

Bonds with Ajit Pawar:बॉण्ड्स

अजित पवार : 24 लाख 79 हजार 760 रुपये.

सुनेत्रा पवार : 14 लाख 99 हजार 610 रुपये.

 

Ajit Pawar Insurance Policy: पोस्ट आणि इन्शूरन्स

अजित पवार : 10 लाख 79 हजार 2155 रुपये.

सुनेत्रा पवार : 44 लाख 29 हजार 463 रुपये.

 

Company Shares with Ajit Pawar:कंपन्यांमधील शेअर्स

सुनेत्रा पवार : 8 कोटी रुपये.

 

वाहन

अजित पवार : 3 ट्रेलर, टोयोटा कॅम्री, होंडा सी-आरव्ही, ट्रॅक्टर 

सुनेत्रा पवार : ट्रॅक्टर, 2 ट्रेलर

 

दागिने

अजित पवार - 41.50 किलो चांदी

सुनेत्रा पवार - 35 किलो चांदी,1.30 किलो सोनं, 28 कॅरेटचा हिरा.

अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे मिळून 1 कोटी लाख 18 हजार 572 रुपयांचे दागिने आहेत. 

 

Land with Ajit Pawar:जमीन

अजित पवार आणि सुनेत्रा पवार नावे वेगवेगळ्या भागात जमीन सुद्धा आहे. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या  37 कोटी 15 लाख 70 हजार रुपयांची जमीन अजित पवारांच्या तर 58 कोटी 39 लाख 57 हजार रुपयांची जमीन सुनेत्रा पवार यांच्या नावावर आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp