Amit Thackeray : पत्नी आणि मुलाच्या नावावर लाखो रुपये, सोनं; अमित ठाकरेंच्या नावावर किती कोटींची संपत्ती?

मुंबई तक

मनसेतून राजकारणाला सुरुवात केलेल्या अमित ठाकरे यांचा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झिक्यूटीव्ह अशा नावाने व्यवसाय आहे. अमित ठाकरे यांच्यावर 4 कोटी 19 लाख रुपयांचं कर्ज असून, 1 लाख 8 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. या संपत्तीमध्ये त्यांच्या पत्नीच्या, मुलाच्या नावावर किती संपत्ती ाहे ते जाणून घेऊ.

ADVERTISEMENT

अमित ठाकरेंची संपत्ती किती?
अमित ठाकरेंची संपत्ती किती?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमित ठाकरेंच्या मुलाच्या नावावर लाखो रुपये

point

स्वत:च्या नावावर एकही गाडी नाही

point

बांधकाम व्यवसायात किती गुंतवणूक?

Amit Thackeray Property मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभेतून मनसेकडून अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या शपथपत्रात आपली संपत्ती जाहीर केली. आपल्या स्वत:च्या नावावर आणि पत्नीच्या नावावर असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी अमित ठाकरे यांच्याकडे एकूण 12 कोटी 54 लाख रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं जाहीर केलं आहे. तर 1 कोटी 29 लाख रुपये एवढी स्थावर मालमत्ता आहे. तसंच वेगवेगळ्या संस्थांमध्ये अमित ठाकरेंची भागीदारी, राज ठाकरेंना दिलेलं कर्ज या सर्वच गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. (Amit Thackeray Property according election commission affidavit)


मनसेतून राजकारणाला सुरुवात केलेल्या अमित ठाकरे यांचा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झिक्यूटीव्ह अशा नावाने व्यवसाय आहे. अमित ठाकरे यांच्यावर 4 कोटी 19 लाख रुपयांचं कर्ज असून, 1 लाख 8 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. या संपत्तीमध्ये त्यांच्या पत्नीच्या, मुलाच्या नावावर किती संपत्ती किती ते जाणून घेऊ.

 

अमित ठाकरेंकडील संपत्ती

 

 

  1. मनसेतून राजकारणाला सुरुवात केलेल्या अमित ठाकरे यांचा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झिक्यूटीव्ह अशा नावाने व्यवसाय आहे. 
  2. अमित ठाकरे यांच्यावर 4 कोटी 19 लाख रुपयांचं कर्ज असून, 1 लाख 8 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. 
  3. अमित ठाकरेंकडे 6 कोटी 29 लाख रुपयांच्या ठेवी असून, 3 कोटी 98 लाख रुपयांचे शेअर्स आहेत. तसंच त्यांच्याकडील पोस्टाच्या खात्यात 20 लाख रुपये आहेत. 
  4. अमित ठाकरे यांच्याकडे एकूण 3 तोळे सोनं आहे.
  5. एकही वाहन अमित ठाकरे यांच्या नावावर नाही. 
  6. कुठल्याही प्रकरणात अमित ठाकरेंवर एकही गुन्हा दाखल  नाही. 
  7. सह्याद्री फिल्ममध्ये 50 टक्के शेअर्स आणि तथास्तु बिल्डर्समध्ये 20 टक्के एवढे शेअर्स आहेत.  


मिताली ठाकरेंच्या नावावर किती संपत्ती?

 

  1. अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या नावावर 1 कोटी 72 लाखांची जंगम मालमत्ता आहे. 
  2. स्थावर मालमत्तेचा आकडा हा 58 लाख 38 हजार एवढा आहे. 
  3. मिताली ठाकरे यांच्याकडे एकूण 5 कोटी रुपयांच्या ठेवी असून, म्युच्यूअर फंडमध्ये 52 लाख रुपये आहेत.
  4. मिताली ठाकरे यांच्याकडे 9 तोळे सोनं आहे. 
  5. अमित ठाकरे यांच्या मुलाच्या नावावर म्युच्यूअल फंडमध्ये 60 लाख रुपये आहेत. तसंच 70 हजार रुपये आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp