Assembly Elections Exit Poll 2024 : सरकार 'यांचं' येणार! 'या' एक्झिट पोलने कोणाची उडवली झोप?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात उद्या कुणाचं सरकार येणार?

point

अपक्ष आणि लहान पक्षांना 18 टक्के मतदान

point

मतदानाच्या टक्केवारीनं कुणाची उडवली झोप?

Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सध्या देशाचं लक्ष लागून आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये झालेल्या सर्व घडामोडींनंतर आणि विशेषत: पक्षफुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यानंतर लोकांचं मत कुणाला मिळणार हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे. उद्या 23 मे रोजी हे निकाल जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी निवडणूक  आयोगाकडूनही मतदानाच्या आकडेवारीचे तपशील समोर आले आहेत. ज्यामाध्यमातून राज्याच्या निकालाचं विश्लेषण करणं अधिक सोपं झालं आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आणि इतर डेटाही समोर आला आहे. त्यामाध्यमातून अनेक गोष्टींचा कल समोर आला आहे. विशेष म्हणजे कुणाला किती मतदान मिळालं हे देखील समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>Maharashtra Elections Exit Poll : कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय? अख्खी यादी आली समोर

 

लोकनिती सीडीएस या संस्थेनं केलेल्या राज्याच्या मतदानाच्या सर्व्हेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे वेगवेगळे कंगोरे समोर आले आहेत. त्यामध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना किती टक्के मतदान मिळालं हे स्पष्ट झालं आहे. या सर्व्हेमधून समोर आलेल्या आकडेवारीमध्ये नेमकं काय काय तपशील आणि त्याचा अर्थ काय होतो हे जाणून घेऊ. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>Prakash Ambedkar: "...हम सत्ता में रहना चुनेंगे!", निकालापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी उडवून दिली खळबळ


 कुणाला किती मतदान?

महाविकास आघाडी 39 %
महायुती 43 %
इतर 18 %

 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

 

 

आकडेवारीचा अर्थ काय? 

समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मतदान मिळू शकतं. राज्यातील तब्बल 39 टक्के मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती दिली असून, तब्बल 43 टक्के मतदारांनी महायुतीला मतदान केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचं पारडं जड ठरल्याचं दिसतंय. राज्यातील 40 मतदारसंघांमधून घेतलेल्या आकडेवारीनुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामध्ये तब्बल 160 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये 46 टक्के महिलांची मतं जाणून घेण्यात आली. तसंच समाजतल्या सर्व घटकांचा सहभाग असावा म्हणून यामध्ये 10 टक्के मुस्लिम, 5 टक्के बुद्ध धर्मीय, शेड्यूल कास्ट 5 टक्के, शेड्यूल ट्राईब्स 6 टक्के लोकांचा समावेश होता. तर सर्व्हे केलल्या एकूण मतदारांपैकी 40 टक्के मतदार हे शहरी भागातील होते अशी माहिती लोकनिती सीडीएस या संस्थेनं दिली आहे. त्यामुळे बहुतांश मतदारांनी महायुतीला मत दिलेलं दिसतंय. मात्र राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये तिहेरी लढती पाहायला मिळाल्या. यामुळे अनेक समीकरणं बदलू शकतात. तसंत 18 टक्के इतर मतदानही किंगमेकर ठरु शकतं अशी शक्यता आहे. 



सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आणि लहान पक्षांची गरज? 
 

वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार महायुतीचं सरकार येईल किंवा अटीतटीची परिस्थिती निर्माण होऊन अपक्ष किंगमेकर ठरू शकतील. त्यामुळे घोडेबाजार टाळण्यासाठीही महाविकास आघाडीचं लक्ष सर्व आमदारांवर असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यासाठीची तयारी सुरू झाली असून, मुंबईतल्या हॉटेलही त्यासाठी बूक केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच बाहेरच्या राज्यातून काँग्रेसचा एक बडा नेता महाराष्ट्रात येणार असून, त्यांच्याकडेच सर्व जबाबदारी असणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे 26 तारखेपर्यंत होणाऱ्या घडामोडींवर देशाचं लक्ष असणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT