Avinash Jadhav Resigns : राज ठाकरेंकडे तक्रार ते जीवघेणाहल्ला... अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यामागची कहाणी

मुंबई तक

पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्यावर पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांकडून केला जातोय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोयते, तलवार, चाकू अशा धारदार शस्त्रांनी मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरेंवर हल्ला

point

मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावर हल्ल्याचा आरोप

 

Avinash Jadhav Resigns :  ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेत असलेला अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच चव्हाट्यावर आला आहे. पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावरही हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडांनी धारदार शस्त्राने आतिश मोरे आणि त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांकडून केला जातोय.


हे ही वाचा >> Maharashtra New CM LIVE : फिर वापस आना पड़ता है...नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात होर्डिंग्स...


रविवारी 1 डिसेंबररोजी दुपारच्या सुमारास अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यानंतर अवघ्या काही वेळेतच बोईसरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर कोयते, तलवार, चाकू अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, जखमी असलेल्या मोरे यांच्यावर सध्या बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मनसेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचं रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत गेल्यानंतर आता मनसेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


अविनाश जाधव यांचा राजीनामा


पालघर मधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रविवारी राज ठाकरेंची भेट घेऊन पराभवाची कारण सांगितली. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. दरम्यान आता या प्रकरणात अविनाश जाधव यांच्यावर झालेल्या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रकरणावर पंक्षार्गत काय निर्णय घेणार हे येणाऱ्या काळातच समोर येईल. 



हे ही वाचा >> Maharashtra CM : मुरलीधर मोहोळांच्यानंतर आणखी एक नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत, माजी मंत्र्यानं स्वत: ट्विट करत...


मनसे नेते अविशाना जाधव यांनी आपण ठाणे आणि पालघरमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन, मी माझ्या पदाचा राजीनामा देतो असं म्हटलंय. तसंच आपल्याकडून काम करताना काही चूक झाली असल्यास माफ करावं असंही त्यांनी म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp