Devendra Fadnavis : मी पुन्हा आलोय... भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री

point

भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

Mumbai BJP Core Committee meeting :  भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदाची बैठक आज पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे सर्व आमदार, वरीष्ठ नेते, पक्षाचे निरीक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीला संबोधित केलं. त्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय रुपाणी यांनी केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर जोरदार टाळ्या वाजवत, जयघोष करत सर्वांकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण आणि पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी अनुमोदन दिलं. 

ADVERTISEMENT


भाजप कोअर कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवताच मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात भाषण करताना निरीक्षक निर्मला सीतारमण यांनी भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केलेल्या कामाचं मोठं कौतुक केलं. 

 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Sukhbir Singh Badal attack : सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा पाकिस्तानातून आला? कोण आहे नारायणसिंग?

 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता दहा दिवस उलटून गेले होते. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नव्हतं. मात्र, आता स्पष्ट झालं आहे. महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत जाऊन आल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र त्यानंतर आज फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. 

दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी नावं समोर आली होती.  धक्कातंत्र वापरलं जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भाजपकडून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या अर्थातच 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT