Kanhaiya Kumar : "आम्ही धर्म वाचवायचा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर...", कन्हैय्या कुमार यांची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दक्षिण-पश्चिम मतदारसंघात वातावरण पेटलं

point

कन्हैय्या कुमार यांचा थेट फडणवीसांवर निशाणा

point

अमृता फडणवीसांबद्दल काय म्हणाले कन्हैय्या...

Nagpur : काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार हे काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी कन्हैय्या कुमार यांनी थेट भाजपच्या अजेंड्यावर निशाणा साधला. हिंदू धर्म वाचवण्याचं आवाहन भाजप नेते करत असतात, मात्र त्यांची मुलं परदेशात शिकत असतात, मग धर्म वाचवण्याची जबाबदारी फक्त आमचीच आहे का असा सवाल कन्हैय्या कुमार यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. 

ADVERTISEMENT


नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. समोर फडणवीसांसारखं तगडं नेतृत्व निवडणुकीच्या मैदानात असल्यानं प्रफुल्ल गुडधे हे देखील मोठी ताकद लावताना दिसत आहेत. अशातच त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते कन्हैय्या कुमार हे उपस्थित होते. यावेळी कन्हैय्या कुमार यांनी थेट भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. धर्म वाचवण्याची जबाबदारी आमची आणि ऑक्सफर्डमध्ये जाऊन शिकण्याची जबाबदारी तुमची? धर्म वाचवायचा असेल तर सगळे सोबत वाचवू ना. धर्म वाचवण्याची जबाबदारी आमचीच आहे का? धर्म वाचवायचा  आणि उपमुख्यमंत्र्‍यांच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर रील बनवायचे? असं नाही चालणार म्हणत कन्हैय्या कुमार यांनी निशाणा साधला. 

 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Pankaja Munde : 'कटेंगे तो बटेंगे' घोषणेची महाराष्ट्रात... पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची चर्चा, नेमकं काय म्हणाल्या?

पुढे बोलताना कन्हैय्या कुमार म्हणाले की, "भाजपचे माझे मित्र म्हणतात की पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना मुलं नाहीत. पण यांची हुशारी आता आम्हाला समजायला लागली. मोदी, योगींना मुलगा नसला तरी पुतण्या आहे ना... जय शाह येतील ना आमच्यासोबत धर्म वाचवायला. पण आम्हाला आता खेळ समजतो. त्यांचा मुलगा BCCI चा अध्यक्ष झाला आणि आम्हाला सांगतात ड्रीम-11 वर टीम बनवा." 

आम्ही फार सहज भावूक होतो, त्याचाच वापर करुन आमच्यापासून आमचे हक्क आणि अधिकार हिसकावून घेतले जातात आणि आमच्या मुलांचं भविष्य खराब करुन त्यांच्या मुलांचं भवितव्य बनवण्याचं काम हे नेते करत आहेत असं म्हणत कन्हैय्या कुमार यांनी हल्लाबोल केला. भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था असेल तर 80 कोटी लोक कोण आहेत, जे 5 किलो धान्यासाठी लाईनमध्ये उभे होते? हा सवाल कन्हैय्या कुमार यांनी केला. जेवढे या देशाचे अरबपती लोक नागरिक असतील, तेवढेच गरीब लोकही या देशाचे नागरिक आहेत असं कन्हैय्या कुमार म्हणाले. जग चंद्रावर जातंय आणि पंतप्रधान मोदी नालीतल्या गॅसवर चहा बनवण्याबद्दल बोलत आहे म्हणत कन्हैय्या यांनी मोदींवर निशाणा साधला. 

ADVERTISEMENT


ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT