Pankaja Munde : 'कटेंगे तो बटेंगे' घोषणेची महाराष्ट्रात... पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची चर्चा, नेमकं काय म्हणाल्या?
महाराष्ट्रात एन्ट्री करत आपल्या पहिल्याच भाषणात कटेंगे तो बटेंगे ही घोषणा दिली होती. त्यावर आता खुद्द भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचंच वेगळं मत पाहायला मिळालं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'कटेंगे तो बटेंगे' नाऱ्याची राज्यात चर्चा
अजित पवार यांच्यानंतर पंकजा मुंडेेंचंही वेगळं मत
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापलेलं दिसतंय. मतदानाची तारीख जेवढी जवळ येतेय, तेवढी नेत्यांच्या भाषणांची धार वाढत जातेय. मविआ आणि महायुतीच्या मोठ्या नेत्यांची फौज सध्या राज्यात उतरेलली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या घोषणांची चर्चा होते आहे. योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात एन्ट्री करत आपल्या पहिल्याच भाषणात कटेंगे तो बटेंगे ही घोषणा दिली होती. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक हैं तो सेफ हैं अशी घोषणा केली होती. त्यावर आता खुद्द भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचंच वेगळं मत पाहायला मिळालं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Priya Sarvankar Vs Amit Thackeray : नेता म्हटलं तर कर्तृत्व, वकृत्व, नेतृत्व हवं, नवा चेहरा द्यायला हा सिनेमा आहे का?
पंकजा मुंडे याबद्दल बोलताना म्हणाल्या, माझं राजकारण वेगळं आहे. बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही. मी त्या पक्षाची आहे म्हणून समर्थन करणार नाही. फक्त विकासावरच काम केलं पाहिजे, असा माझा विश्वास आहे. प्रत्येक माणासाठी इथे जगण्यासाठी पोषक वातावरण बनवणं ही नेत्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे हे सगळं महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही. मोदीजींनी सर्वांना न्याय दिला आहे. लोकांना रेशन, घर आणि सिलेंडर देताना मोदींनी जात, धर्म पाहिला नाही. योगी आदित्यनाथ यांनी ती घोषणा वेगळ्या संदर्भानं आणि उत्तर प्रदेशच्या राजकीय स्थितीनुसार दिली असावी. त्याचा अर्थ असा नाही की, ती महाराष्ट्रात चालणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अजित पवारांचाही विरोध
'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेला अजित पवार यांनीही विरोध केला होता. अशा घोषणा उत्तर प्रदेश किंवा झारखंडमध्ये चालतील, महाराष्ट्रात ते चालणार नाही अशी स्पष्ट भूमिक अजित पवार यांनी घेतली होती. अजित पवार म्हणाले होते की, या गोष्टी इथे चालत नाही, इतर राज्यात चालतात. ते इतर राज्याचे नेते आहेत भाजपचे, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काय बोलावं ते त्यांचं मत आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत 'सबका साथ, सबका विकास'चा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना मानणारा पक्ष असल्याचं अजित पवार वारंवार सांगत असतात. मात्र थेट महायुतीच्या नेत्यांच्या घोषणेला असहमती दाखवणं ही अजित पवार यांची भूमिका खरंच महायुतीत पडलेला मिठाचा खडा आहे की महायुतीचा प्लॅन अशी चर्चा सध्या सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मतांचं गणित साधण्यासाठी ही खेळ केल्याचीही शक्यता आहे.
ADVERTISEMENT