Chhagan Bhujbal : "शिंदेंच्या बरोबरीतच आम्हालाही...", मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटण्यापूर्वी भुजबळांची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ यांची मागणी काय?

point

स्ट्राईक रेट सांगत काय म्हणाले भुजबळ?

राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते रुग्णालयात भरती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे भाजपने शपथविधीची तारीखही जाहीर केली आहे. फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रि‍पदाची माळ पडणार अशी चर्चा सुरू असली तरी, दुसरीकडे धक्कातंत्र वापरलं जाणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. याच सर्व घडामोडींवर आज छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. काय चर्चा सुरू आहेत हे माहिती नाही, पण आमचा स्ट्राईकरेट जास्त असल्यानं आम्हाला शिंदेगटाच्या बरोबरीचीच खाती मिळावी असं भुजबळ म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT



हे ही वाचा >> Mohit Kamboj Vs Gajabhau : मोहित कंबोज यांचं पुन्हा ट्विट, 'गजाभाऊ'कडून पुन्हा उत्तर, म्हणाला बापाचं नाव...


मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही निश्चित नसून, मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच छगन भुजबळ यांनी आपल्याला चर्चेबद्दल अजिबात माहीत नाही असं म्हटलं. मात्र, पुढे बोलताना ते म्हणाले, "अजित पवार आणि आमच्या आमदारांमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली हे खरं आहे. निवडणुकीच्या वेळी शिंदे गटाला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळेच त्यांचे जास्त आमदार निवडून आले. मात्र आम्हाला खूप कमी जागा मिळाल्या. स्ट्राइक रेट जर पाहिला तर, भाजप नंबर एकवर आहे, अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकावर आहे तर एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. आकड्यांमध्ये थोडाच फरक आहे. आम्ही म्हणतोय आमचा स्ट्राईक रेटही चांगला आहे. त्यामुळे आम्हाला शिंदे गटाच्या बरोबरीची जागा द्या." असं भुजबळ म्हणाले आहेत. 

 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maharashtra CM LIVE Updates : मारकडवाडी घटनेचा मास्टरमाईंड कोण? राम सातपुतेंनी थेट सांगितलं, म्हणाले...

 

दरम्यान, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याचं समोर आलं आहे. ते आज ज्युपिटर रुग्णालयात चेक अपसाठी गेले होते. तर दुसरीकडे आझाद मैदानात शपथविधीची तयारी सुरू असल्याचंही दिसतं आहे. या सर्व घटनांवरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनीही जोर धरल्याचं दिसतंय. त्यामुळे 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. 



ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT