CM Eknath Shinde: "गुंडा असावा असा, ज्याच्या हातात असावा बाळासाहेबांचा...", शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली सडकून टीका

point

"ठाकरे येऊन गेले. सुहासला म्हणाले गुंड, पण तुम्ही तर..."

point

नाशिकच्या सभेत एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray:  "ठाकरे येऊन गेले. सुहासला म्हणाले गुंड आहे. गुंड आहे ना आपण..हा बाळासाहेबांचं सच्चा शिवसैनिक आहे. गुंडा असावा असा, त्याचा हातात असावा बाळासाहेबांचा भगवा झेंडा. तो बाळासाहेबांचा भगवा झेंडा सुहासच्या हातात आहे. पुत्र व्हावा असा गुंडा, त्याचा हातात असावा बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा. माझ्यासह सुहासने बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा घेतलाय. सुहास त्यांच्याबरोबर होता तेव्हा चांगला होता आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेला आणि तो गुंड झाला. पण तुम्ही तर दरोडेखोर आहात, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. ते शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारसभेत नाशिकमध्ये बोलत होते.

ADVERTISEMENT

"मुंबई लुटली, कोविडमध्ये पैसे खाल्ले. लोकांच्या तोंडची खिचडी चोरली. कोविड सेंटरची खोटी बिलं काढून पैसे घेतले. कोविडमध्ये माणसं मरत होती. तुम्ही इकडे पैसे मोजत होता. मग गुंड बरा की दरोडेखोर बरा. चंबलच्या खोऱ्यातले डाकू परवडले पण हे मुंबईच्या खोऱ्यातले दरोडेखोर नाय परवडले. मुंबई लुटली, महाराष्ट्र लुटला..लोकांना काय मिळालं. आमच्या सुहासची उगाच कळ काढू नका. कुणाच्या मनगटात किती बळ आहे, हे 23 तारखेला समजेल", असंही शिंदे म्हणाले.

हे ही वाचा >> Sharad Pawar Madha : "सगळ्यांचा नाद करायचा, पण...", शरद पवारांचं उघड उघड चॅलेंज!

शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,"आमच्या सुहासच्या भात्यात जनतेच्या ताकदीचा आहे धनुष्यबाण. म्हणून 23 तारखेला सुहास कांदे यांच्यावर गुलाल उधाळणार. सुहास कांदेंनी 15 वर्ष या नांदगावच्या जनतेची सेवा केली आहे. नांदगाव मतदारसंघाचा विकास शिवसेनेशिवाय होऊ शकत नाही. शिवसेना हेच पर्याय आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला सुहासला निवडून द्यायचा आहे. काळ्याला काळं आणि पांढऱ्याला पांढरं म्हणणारा सुहास रांगडा गडी आहे. सुहासने लाडक्या बहिणींचे 92 हजार फॉर्म भरले. या सभेला लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी आहेत". 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Supriya Sule: "बहिणीच्या नात्याची किंमत 1500, पण..."; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

म्हणून तुमचा लाडका भाऊ तुमच्याशी संवाद साधायला आला आहे. तुमचं सर्वांचं दर्शन घ्यायला आला आहे. तुमच्याशी बोलायला आला आहे. आपण लाडकी बहीण योजना केली. लोकांच्या पोटात दुखायला लागलं. ही लाडकी बहीण फक्त कागदावर राहील, असं म्हणाले. पण आम्ही महायुती सरकारनं ठरवलं आणि ही लाडकी बहीण योजना सुरु केली, असं मोठं विधान एकनाथ शिंदेंनी केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT