Sharad Pawar Madha : "सगळ्यांचा नाद करायचा, पण...", शरद पवारांचं उघड उघड चॅलेंज!
सोलापूरमधील माढा मतदारसंघात अभिजीत पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेत असताना पुन्हा एकदा शरद पवार यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
"साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं"
Maharashtra Vidhan Sabha : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आलाय. राज्यभर सुरू असलेल्या मविआ, महायुती, वंचित, मनसेच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. शरद पवार यांनी यंदाच्या निवडणुकीतही वादळी दौरा करत महाविकास आघाडीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. अशातच आज शरद पवार सोलापूरमधील माढा मतदारसंघात अभिजीत पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेत असताना पुन्हा एकदा त्यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. अभिजीत पाटील यांच्याविरोधात या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे चिरंजीव रणजीत शिंदे हे मैदानात आहेत. यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना रणजीत शिंदे यांना पाडण्याचं आवाहन केलंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Ajit Pawar : महाष्ट्रातलं सरकार CM योगी चालवणार नाहीयेत, 'बटेंगे तो कटेंगे' वादावर दादा स्पष्ट बोलले
कितीही संकटं आलीत तरी मजबूत राहणारे तुमच्या मतदारसंघाचे उमेदवार इथे उभे आहेत, आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा विचार करतोय, मोहितेंनी जबाबदारी घेतली आहे असं शरद पवार म्हणाले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातला माझा एक अनुभव आहे, मी आतापर्यंत सात निवडणुका लढलो. काही लोक आपल्यामुळे निवडून येतात आणि नंतर सोडून जातात. 1980 सालची निवडणूक झाली, त्यावेळी आमचे 58 उमेदवार निवडून आले. मी परदेशात गेलो असताना मुख्यमंत्री अंतुलेंनी चमत्कार केला आणि 52 लोक घेऊन गेले आणि मी फक्त 6 लोकांचा नेता राहिलो. तेव्हा विरोधीपक्षनेतेपद गेलं. पण मी नंतरचे तीन वर्ष अहोरात्र प्रयत्न केले. जे मला सोडून गेले त्यांच्याविरोधात मी नव्या पिढीचे उमेदवार दिली. त्यावेळी सोडून गेलेले सर्व 52 उमेदवार पडले असं शरद पवार म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Priyanka Gandhi: "मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी...", प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
माढा तालुक्यात आता काय करायचं? असं शरद पवार यांनी सवाल केला. त्यावेळी उपस्थितांना 'पाडा' म्हणत उत्तर दिलं. "आता त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. ती जागा दाखवायची असेल, तर साधंसुधं पाडायचं नाय... जोरात पाडायचं" असं आवाहन त्यांनी केलं. तसंच सभेतील उपस्थितांना साद घालत ते म्हणाले की, सर्वांचा नाद करायचा, पण....उपस्थितांमधून "पवार साहेबांचा नाद करायचा नाही" असा जयघो ऐकू आला.
ADVERTISEMENT