Mumbai Tak Chavdi: 'लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात, तुम्ही 3000 देणार का?', नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nana Patole On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसारख्याच योजना तुम्हीसुद्धा (काँग्रेस) लोकसभेच्या वेळी न्यापत्रात जाहीर केल्या होत्या. दीड हजार देतायत, मग तुम्ही तीन हजार देणार आहेत का? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेबाबत नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
मुंबई तकच्या चावडीत नाना पटोलेंनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर केलं भाष्य
महाविकास आघाडी लाडक्या बहिणींना 3000 देणार का?
Nana Patole On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसारख्याच योजना तुम्हीसुद्धा (काँग्रेस) लोकसभेच्या वेळी न्यापत्रात जाहीर केल्या होत्या. दीड हजार देतायत, मग तुम्ही तीन हजार देणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "लाडकी बहिणीचे जे गुणगाण गातात, त्या बेईमान भावांनी आमच्या लाडक्या बहिणींना दीड हजार रूपये दिले. त्याच काळात महागाईचे दर कसे वाढले आहेत, ते तुम्ही बघा. दीड हजाराच्या जागी आमच्या बहिणींकडून दर महिन्याला पाच हजार रपये महागाईच्या माध्यमातून काढून घेतले.
आपल्या बहिणींना पैसे दिले आणि तिच्या खिशातून जास्त पैसे काढले. महागाई वाढवून टाकली. ही बेईमानी आहे, एकप्रराची. आमच्या बहिणींसोबत ही चिटींग केली. आम्ही त्या पद्धतीचं चिटींग करणार नाही. आमची महागाई कमी करण्याची भूमिकाही घेणार आहोत", असं मोठं विधान करतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते मुंबई तकच्या चावडीत बोलत होते.
हे ही वाचा >> MVA Seat Sharing : जागावाटपाच्या बैठकीत पटोले, राऊतांमध्ये खडाजंगी झाली? राऊतांचं उत्तर ऐकाच!
लाडकी बहीण योजनेबाबत नाना पटोले काय म्हणाले?
"दीड हजार किंवा दोन हजार रुपयांनी लाडक्या बहिणींचं भलं होतंय, असं आम्ही मानत नाही. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी गृह उद्योगापासून अनेक योजना आम्ही आणतोय. त्या पद्धतीचा आमच्याकडे प्लॅन तयार आहे. आमची भगिनी लक्ष्मी व्हावी. ती लक्ष्मीचच रुप आहे. तिला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा आमचा संकल्प आहे. दीड हजार किंवा दोन हजारात त्यांची परिस्थिती दुरुस्त होणार नाही. लाडकी बहिणीचे जे गुणगाण गातात, त्या बेईमान भावांनी आमच्या लाडक्या बहिणींना दीड हजार रूपये दिले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> प्रचंड मोठी बातमी... राज ठाकरेंचं ठरलं, निवडणुकीनंतर BJP सोबत जाणार...
त्याच काळात महागाईचे दर कसे वाढले आहेत, ते तुम्ही बघा. दीड हजाराच्या जागी आमच्या बहिणींकडून दर महिन्याला पाच हजार रपये महागाईच्या माध्यमातून काढून घेतले. आपल्या बहिणींना पैसे दिले आणि तिच्या खिशातून जास्त पैसे काढले. महागाई वाढवून टाकली. ही बेईमानी आहे, एकप्रराची. आमच्या बहिणींसोबत ही चिटींग केली. आम्ही त्या पद्धतीचं चिटींग करणार नाही. आमची महागाई कमी करण्याची भूमिकाही घेणार आहोत. ६ तारखेला मलिक्कार्जून खरगे आणि राहुल गांधी येणार आहेत. आम्ही त्यावेळी पाच घोषणा करणार आहोत. त्यामध्ये महिलांची सुरक्षा, महिलांना न्याय देण्याची प्रक्रिया, शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षेची हमीही आम्ही देणार आहोत.
ADVERTISEMENT