Congress Song : यंदा पंजा, यंदा पंजा... काँग्रेसचं प्रचारगीत, नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? का होतेय चर्चा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

यंदा पंजा, यंदा पंजा, यंदा पंजा...

point

विधानसभेसाठी काँग्रेसचं नवं प्रचारगीत

point

प्रचारगीतामध्ये नाना पटोलेंचा बोलबाला!

Maharashtra Vidhan Sabha महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळेच उरलेल्या काही दिवसांत आपली छाप पाडण्याच्या प्रयत्नात सगळेच राजकीय पक्ष सध्या दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता काही जागा वगळता बहुतांश जागांचं चित्र महायुती आणि मविआसाठी स्पष्ट आहे. त्यातच आता प्रचारासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. मविआचा महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसने नुकतंच आपलं प्रचारगीत रिलीज केलंय. यंदा पंजा, यंदा पंजा... या गाण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय. (Congress release campaign song amid vidhan sabha elections  2024)

यंदा पंजा, यंदा पंजा या गाण्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्यांची मोठी टीम मैदानात उतरल्याचं दाखवण्यात आलंय. तसंच रोजगारी, संविधानाचं संरक्षण, शाहू फुले आंबेडकरांची विचार, शेतकरी, महिला यांच्या विकासाचा निर्धार काँग्रेसने केला असल्याचं या गाण्यातून सांगण्यात आलंय. या गाण्याची चर्चा मात्र एका वेगळ्याच गोष्टीमुळे होतेय. कांग्रेसने रिलीज केलेल्या या गाण्यात 10 पेक्षा जास्त वेळा नाना पटोले यांची झलक दिसतेय. अगदी गाण्याच्या सुरुवातीपासून ते मध्ये वेगवेगळ्या नेत्यांचे दृष्यांनंतर पुन्हा नाना पटोलेंची एन्ट्री होते. त्यामुळे नाना पटोलेंना या प्रचारात महत्वाचं स्थान असल्याचं स्पष्ट झालंय. 

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची तब्येत खालवली! अंतिम निर्णयाची वेळ येताच नेमकं काय घडलं? 

 

राज्यात लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीपासूनच मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाची चर्चा आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोन्हीकडे या प्रश्नावरुन वेगवेगळे मतं व्यक्त केले जातात. महायुती आणि मविआमध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या समर्थकांकडून मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर झळकवले होते. यामध्ये अनेकदा नाना पटोले यांच्या 'भावी मुख्यमंत्री' अशा बॅनरची फारच चर्चा झाली होती. 

 

हे ही वाचा >>Maharashtra Assembly Election 2024 LIVE : "शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची लूट" रमेश चेन्नीथला स्पष्टच बोलले!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT