Video: "जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा...", भाजपने उद्धव ठाकरेंवर केला पलटवार, फडणवीसांच्या बॅगेत काय सापडलं?
Devendra Fadnavis Bag Checked Video: भाजपनेही एक्सवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ शेअर करत ठाकरेंवर पलटवार केला आहे. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्र भाजपने फडणवीसांंची बॅग तपासल्याचा व्हिडीओ केला शेअर
भाजपने व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंना सुनावलं
फडणवीसांच्या बॅगेत नेमकं काय सापडलं? पाहा व्हिडीओ
Devendra Fadnavis Bag Checked Video: उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये जाऊन त्यांची बॅग तपासली. यावेळी ठाकरेंनी स्वत: व्हिडीओ काढून अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता भाजपनेही एक्सवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ शेअर करत ठाकरेंवर पलटवार केला आहे. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र भाजपचं ट्वीट जसंच्या तसं
"जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली. (हा तो 5 नोव्हेंबरचा व्हिडिओ)
दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे".
हे ही वाचा >> Uddhav Thackeray Interview: "...म्हणून मी भाजपसोबत जाणार नाही"; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये जाऊन त्यांची बॅग तपासली होती. यावेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही अशाच प्रकारे तपासणी केलीय का? असा सवाल ठाकरेंनी अधिकाऱ्यांना केला होता. मंगळवारी उद्धव ठाकरे लातूरला पोहोचल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बॅग तपासली होती. याआधी सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील वणीत ठाकरेंची बॅग तपासण्यात आली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : "वडिलांना झालेल्या वेदना मी...", रक्ताच्या नात्याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलले
लातूरममध्ये गडकरीचं हेलिकॉप्टर तपासलं
याआधी मंगळवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी लातूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली होती. गडकरी निवडणुकीच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी लातूरमध्ये गेले होते. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याही बॅगेची तपासणी केलीय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT