Devendra Fadnavis: "माझ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही, तर...", देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांचं मोठं विधान

point

"2028 पर्यंत 50 लाख लाडक्या बहिणींना..."

point

आर्वीच्या सभेत फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी. या जोपर्यंत सामाजिक, आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी येत नाहीत. तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही. मोदीजींनी बेटी बचाव, बेटी पढावपासून लखपती दीदीपर्यंतचे 14 योजना आपल्याला दिल्या. मोदीजींच्या योजनांमधून जी महिला आपला व्यवसाय सुरु करते आणि वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते. तिला लखपती दीदी म्हटलं जातं. या महाराष्ट्रात 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. आता 25 लाख लखपती दीदी करू. 2028 पर्यंत 50 लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीद करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

ADVERTISEMENT

फडणवीस पुढे म्हणाले, सुमित वानखेडे यांना ही जनता निवडून देणार आहे. या आर्वी विधानसभा मतदारसंघातील माझ्या किमान 25 हजार लाडक्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजेत. त्याकरिता जी मदत तुम्हाला लागेल, ती मदत हा देवाभाऊ तुम्हाला करेल. पण माझ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही, तर लखपती दीदी करायचं आहे. त्यासाठी मोदींजी योजना आपण घेऊन आलो आहोत.

हे ही वाचा >> Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेबाबत CM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले, "एक घरात दोन बहिणी..."

फडणवीस विरोधकांवर टीका करत म्हणाले, "काँग्रेसचे नेते लबाड आहेत. निवडणूक आल्यावर हे वाटेल ती आश्वासनं देतात. निवडणूक संपली की यांची आश्वासनं संपून जातात. या जिल्ह्यात सिंचनाचे इतके प्रकल्प आम्ही सुरु केले की, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचवत आहोत. शेतकऱ्यांची शेती बारमाही होत आहे. जे कुणालाच शक्य नाही. ते करणारे आम्ही आहोत. ज्यावेळी मी समृद्धी महामार्ग घोषित केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Supriya Sule: टेक्सटाइल पार्कमध्ये आईला अडवलं, सुप्रिया सुळेंच्या जिव्हारी लागलं.. अजितदादांना भडाभडा सुनावलं!

"55 हजार कोटी रुपयांचा रस्त कधी होऊ शकतो का? असं लोक म्हणायचे. आम्ही महामार्ग करून दाखवला. आता याच वर्धा जिल्ह्यात आपण या ठिकाणी लॉजिस्टीक हब तयार करतोय. कारंजात वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून साडे सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. पंधरा हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. इथे सौर उर्जा निर्मिती होत असल्याने पंधराशे मुलांच्या हाताला काम मिळणार आहे. जे कोणी करु शकत नाही, ते आम्ही या ठिकाणी करतो. म्हणूनच जनतेचा विश्वास आमच्या पाठिशी आहे, असंही फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT