Devendra Fadnavis : फडणवीस सरकारमध्ये राहणार की जाणार? दिल्लीत झाला मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis stay maharashtra government or leave what decision taken bjp delhi core committee delhi bjp maharashtra
दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.
social share
google news

Devendra Fadnavis News : ''मला सरकारमधून मुक्त करावे'' अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या पराभवानंतर केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. एकंदरीत फडणवीस यांनी त्यावेळी उप मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र याबाबात केंद्रीय नेतृत्वाकडून कोणताच निर्णय आला नव्हता. आज दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विनंतीवर निर्णय घेण्यात आला आहे. नेमका हा निर्णय काय झालाय? हे जाणून घेऊयात. (devendra fadnavis stay maharashtra government or leave what decision taken bjp delhi core committee) 

महाराष्ट्र भाजपची दिल्लीत कोअर कमिटीसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन बैठकीतला तपशील सांगितला.यावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत पियूष गोयल देखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कुठे मतं कमी मिळाली? कुठे मतं जास्त मिळाली? त्यामागची कारणे काय होती? कोणता मुद्दा त्या ठिकाणी निर्णायक ठरला? या सगळ्या मुद्यावर चर्चा झाली, असे फडणवीस यांनी सांगितले. महायुतीच्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन विधानसभा कशी जिंकता येईल? यासंदर्भातला एक रोडमॅप तयार करण्यात आल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले. 

हे ही वाचा : '...तर उद्धव ठाकरेंचा फायदा होईल..', प्रकाश आंबेडकरांचं प्रचंड मोठं विधान!

पत्रकारांनी यावेळी महाराष्ट्रातीस नेतृत्व बदलावर काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर मौन बाळगलं आणि पियुष गोयल यांनी महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणतेही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सरकारमधून मुक्त करण्याची विनंती भाजपच्या हायकमांडने फेटाळली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर कायम राहणार आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच भूकंप..., भुजबळ 'या' दोन मोठ्या नेत्यांच्या संपर्कात?

फडणवीसांची हायकमांडला विनंती 

भाजपची महाराष्ट्रात झालेल्या पिछाडीची मी जबाबदारी स्विकारतो. आपण स्वत: कुठेतरी कमी पडलो. ती कमकरता भरून काढण्यासाठी व विधानसभेकरिता पुर्णवेळ काम करायचे असून, मला सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली होती. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT