Constituency Wise congress Candidates List: काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार जाहीर; ठाकरेंना काय संदेश?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

congress Candidates: काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
congress Candidates: काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

point

काँग्रेसने कोणाला दिली उमेदवारी, कोणाचा पत्ता केला कट?

point

काँग्रेसकडून 48 उमेदवारांची यादी जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 Congress 1st Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने रविवारी (20 ऑक्टोबर) पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसने 48 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये बरीच सुंदोपसुंदी सुरू होती. एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन्ही पक्ष हे स्वबळाची भाषा करत असल्याची कुजबूज देखील राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर करून या सगळ्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने काल (23 ऑक्टोबर) पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसनेही आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 

हे ही वाचा>> Mahayuti : महायुतीत 4 जागांवरुन अंतर्गत कलह? 'या' उमेदवारांवर शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप असल्याची चर्चा

एकीकडे भाजप हे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडमध्ये मागीला काही दिवस हे चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच होतं. पण आता काँग्रेसने शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासह महायुतीला टक्कर देण्याची तयारी केली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून बरेच अंदाज बांधले जात होते. अखेर आता काँग्रेसची पहिली यादी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचं चित्र हे काहीसं स्पष्ट झालं आहे. 

पाहा काँग्रेसची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 1st Candidates List)

 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं 

  1. के. सी. पाडवी : अक्कलकुवा 
  2. राजेंद्र गावीत : शहादा 
  3. किरण तडवी : नंदूरबार
  4. श्रीक्रिशकुमार नाईक : नवापूर 
  5. प्रवीण चौरे : साक्री 
  6. कुणाल पाटील : धुळे ग्रामीण
  7. धनंजय चौधरी : रावेर 
  8. राजेश एकडे : मलकापूर 
  9. राहुल बोंडरे : चिखली 
  10. अमित झनक : रिसोड
  11. विरेंद्र  जगताप : धामणगाव रेल्वे
  12. सुनील देशमुख : अमरावती 
  13. यशोमती ठाकूर : तिवसा 
  14. अनिरूद्ध देशमुख : अचलपूर 
  15. रंजित कांबळे : देवळी  
  16. प्रफुल गुडाधे : नागपूर दक्षिण पश्चिम 
  17. बंटी शेळके : नागपूर मध्य
  18. विकास ठाकरे : नागपूर पश्चिम
  19. नितीन राऊत :  नागपूर उत्तर
  20. नाना पटोले : साकोली 
  21. गोपालदास अग्रवाल : गोंदीया 
  22. सुभाष धोते :  राजूरा 
  23. विजय वड्डेटीवार : ब्रम्हपूरी 
  24. सतीश वारजूकर : चिमूर
  25. माधवराव पाटील: हदगाव 
  26. तिरूपती कोंडेकर : भोकर 
  27. मिनल पाटील: नायगाव 
  28. सुरेश वरपुडकर: पाथरी 
  29. विलास औताडे : फुलंब्री 
  30. सय्यद हूसेन  : मिरा भाईंदर
  31. अस्लम शेख : मालाड पश्चिम 
  32. आरीफ खान : चांदीवली 
  33. ज्योती गायकवाड : धारावी 
  34. अमिन पटेल : मुंबादेवी 
  35. संजय जगताप : पूरंदर 
  36. संग्राम थोपटे : भोर 
  37. रविंद्र धंगेकर : कसबा पेठ
  38. विजय थोरात : संगमनेर 
  39. प्रभावती घोगरे : शिर्डी 
  40. धीरज देशमुख : लातूर ग्रामीण 
  41. अमित देशमुख : लातूर शहर 
  42. सिद्धाराम म्हेत्रे : अक्कलकोट 
  43. पृथ्वीराज चव्हाण : कराड दक्षिण 
  44. ऋतुराज पाटील : कोल्हापूर दक्षिण 
  45. राहुल पाटील : करवीर 
  46. राजू आवळे :  हातकणंगले  
  47. डॉ.विश्वजीत पतंगराव कदम : पलूस-कडेगाव 
  48.  विक्रमसिंह सावंत : जत

काँग्रेसने 2019 विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवलेल्या?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होती. त्यामुळे काँग्रेसने राज्यात 147 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 121 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुटली होती. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या.

हे ही वाचा>> NCP Sharad Pawar Party Candidate List: पवारांनी पत्ते केले उघड, NCP-SP ची पहिली यादी आली समोर!

44 आमदार असूनही काँग्रेस 2019 मध्ये कसं आलेलं सत्तेत?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यामध्ये राज्यातील जनतेने महायुतीला म्हणजेच शिवसेना आणि भाजपला बहुमत दिलं होतं. पण कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिलं नव्हतं. त्यावेळी भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता. 

2019 मध्ये सर्वात कमी जागा मिळविणारा पक्ष हा काँग्रेस होता. पण असं असून देखील काँग्रेस त्यावेळी सत्तेत आला होता. निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजपसोबत फारकत घेऊन थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळेच केवळ 44 जागा निवडून आलेल्या असून देखील काँग्रेसने सत्तेत स्थान मिळवलं होतं.  

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसला भरघोस यश

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात प्रचंड मोठं यश मिळवलं. तब्बल 13 जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा करताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा भाव हा चांगलाच वधारला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT