Anil Deshmukh: मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी, गाडीवर तुफान दगडफेक
Anil Deshmukh Injured: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर काटोलनजीक तुफान दगडफेक करण्यात आली असून त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कारवर दगडफेक
दगडफेकीत अनिल देशमुख गंभीर जखमी
अनिल देशमुख काटोलमधील खासगी रुग्णालयात दाखल
Anil Deshmukh: काटोल: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर काही वेळापूर्वीच तुफान दगडफेक करण्यात आली असून त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे.
ADVERTISEMENT
नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तीने त्यांच्या गाडीवर अचानक मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.
नेमकं घडलं तरी काय?
ज्यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Uddhav Thackeray : "संपूर्ण मुंबई आपल्या ताब्यातून हिसकावून...", उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
या दगडफेकीत अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मुलगा सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी ते काटोल येथे गेले होते. तिथून परतत असतानाच त्यांच्या गाडीवर अचानक हा हल्ला करण्यात आला.पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतशी अधिक माहिती अपेक्षित आहे.
सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या काही छायाचित्रांमध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे आणि काही लोक त्यांना घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या एका फोटोत ते काही लोकांसोबत बसलेले असून त्यांच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाचा टॉवेल बांधला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Maharashtra Vidhansabha Election 2024: बारामतीतील प्रचाराच्या शेवटच्या सभेतील शरद पवारांचं भाषण जसंच्या तसं...
अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून अनिल देशमुख हे विधानसभेवर निवडून गेले होते. पण यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. सलील देशमुखांविरोधात भारतीय जनता पक्षाने चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.
ADVERTISEMENT
मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी शनिवारी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या उपस्थितीत काटोलमध्ये सलीलचा प्रचारही केला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता.
ADVERTISEMENT