Raj Thackeray MNS Candidate List: अमित ठाकरेंना तिकीट जाहीर, राज ठाकरेंकडून मनसेची यादी जाहीर
Raj Thackeray MNS party Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मनसेने अखेर त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये राज ठाकरेंनी 45 उमेदवारांची नावं घोषित केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज ठाकरेंनी मनसेचे उमेदवार उतरवले रिंगणात
मनसेची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर
राज ठाकरेंनी मुलगा अमित ठाकरेंनाही दिली उमेदवारी
Maharashtra Assembly Election 2024 MNS Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने (MNS)आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, या यादीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी आपले पुत्र अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढविण्याची भूमिक घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही जागा लढवली नव्हती. किंबहुना राज ठाकरेंनी मनसेच्या वतीने महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा देखील घेतल्या होत्या. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वबळावर लढणाचा निर्णय घेतला असून त्यासाठी तयारी देखील केली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणूक ही मनसेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. कारण 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक-एक आमदारच निवडून आला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी मनसेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
पाहा मनसे पक्षाची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MNS 1st Candidates List)
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मनसेची दुसरी संपूर्ण यादी
1. कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) रतन पाटील
2. माहीम - अमित राज ठाकरे
3. भांडुप पश्चिम - शिरीष सावंत
4. वरळी - संदीप देशपांडे
5. ठाणे शहर - अविनाश जाधव
6. मुरबाड - संगिता चेंदवणकर
7. कोथरूड - किशोर शिंदे
8. हडपसर - साईनाथ बाबर
9. खडकवासला - मयुरेश वांजळे
10. मागाठाणे - नयन कदम
11. बोरीवली - कुणाल माईणकर
12. दहिसर - राजेश येरुणकर
13. दिंडोशी - भास्कर परब
14. वर्सोवा - संदेश देसाई
15. कांदिवली पूर्व - महेश फरकासे
16. गोरेगाव - वीरेंद्र जाधव
17. चारकोप - दिनेश साळवी
18. जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे
19. विक्रोळी - विश्वजीत ढोलम
20. घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
21. घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे
22. चेंबूर - माऊली थोरवे
23. चांदिवली - महेंद्र भानुशाली
24. मानखुर्द-शिवाजीनगर - जगदीश खांडेकर
25. ऐरोली - निलेश बाणखेले
26. बेलापूर - गजानन काळे
27. मुंब्रा-कळवा - सुशांत सूर्यराव
28. नालासोपारा - विनोद मोरे
29. भिवंडी पश्चिम - मनोज गुळवी
30. मिरा-भाईंदर - संदीप राणे
31. शहापूर - हरिश्चंद्र खांडवी
32. गुहागर - प्रमोद गांधी
33. कर्जत-जामखेड - रवींद्र कोठारी
34. आष्टी - कैलास दरेकर
35. गेवराई - मयुरी म्हस्के
36. औसा - शिवकुमार नागराळे
37. जळगाव शहर - अनुज पाटील
38. वरोरा - प्रवीण सूर
39. सोलापूर दक्षिण - महादेव कोगनुरे
40. कागल - रोहन निर्मळ
41. तासगांव - कवठे महाकाळ - वैभव कुलकर्णी
42. श्रीगोंदा - संजय शेळके
43. हिंगणा - विजयराम किनकर
44. नागपूर दक्षिण - आदित्य दुरूगकर
45. सोलापूर शहर-उत्तर - परशुराम इंगळे
मनसेला सलग 10 वर्ष अपयश
2009 विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा झंझावात पाहायला मिळाला होता. त्यावेळी मनसेने आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 13 आमदार निवडून आणले होते. मात्र त्यानंतरच्या सलग दोन्ही विधानसभा या मनसेसाठी अत्यंत वाईट निकाल देणाऱ्या ठरल्या. कारण महाराष्ट्रातील जनतेने त्यांना सपशेल नाकारलं. ज्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी मनसे सोडून इतर पक्षांची वाट धरली.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांचा बसला त्यांना फटका?
राज ठाकरे हे सातत्याने त्यांच्या राजकीय भूमिका बदलत असल्याचं बोललं जातं. ज्यामुळे त्यांचा एकगठ्ठा मतदार तयार होऊ शकला नाही. कधी सत्ताधाऱ्यांविरोधात तर कधी सत्ताधाऱ्यांसोबत अशी भूमिका घेतल्याने राज ठाकरे यांच्याबाबत मतदारांच्या मनात संभ्रम राहिला आणि त्यामुळेच त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही.
ADVERTISEMENT
मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक ही सर्वाथाने वेगळी आहे. कारण मागील 5 वर्षात राज्यातील सगळी राजकीय समीकरणं ही बदलून गेली आहेत. अशावेळी आता राज्यातील जनता आता मनसेबाबत का विचार करते हे आगामी निवडणुकीत समजेल.
ADVERTISEMENT