Mumbai assembly voting 2024: मुंबई कोणाची... मुंबईकरांकडून किती टक्के मतदान?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

2024 Mumbai Assembly Elections Voting: मुंबई विभागातील मतदानाची टक्केवारी
2024 Mumbai Assembly Elections Voting: मुंबई विभागातील मतदानाची टक्केवारी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राज्यभरात मतदान सुरू

point

मुंबई विभागात एकूण 36 जांगासाठी मतदान

point

पाहा मुंबई विभागात किती टक्के मतदान झालं

2024 Live Mumbai Assembly election 2024: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) राज्यात सर्वत्र मतदान होत आहे. मुंबई विभागातील एकूण 36 मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येता आहे. मुंबई विभाग हा नेहमीच मिश्र स्वरुपाचा राहिला आहे. त्यामुळे इथे सर्वच पक्षाचं थोड्या-फार प्रमाणात प्राबल्य राहिलं आहे. त्यामुळे मुंबई नेमकी कोणाची हे ठरवणारी देखील ही निवडणूक आहे.

ADVERTISEMENT

मुंबई विभागात विधानसभेच्या एकूण 36 जागा असून त्यापैकी अनेक जागी शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना (ठाकरे) अशीच लढत आहे. तर अनेक ठिकाणी भाजपचे देखील विद्यमान आमदार असल्याने भाजप देखील मुंबईत आपली ताकद पुन्हा दाखविण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे मुंबईत नेमकी कोणाची ताकद सर्वाधिक आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.

हे ही वाचा>> Maharashtra Election: मुंबईच्या मतदारांसाठी गुड न्यूज! मध्य रेल्वे चालवणार स्पेशल ट्रेन, 'असं' आहे शेड्युल

लोकसभा निवडणुकीत मुंबई विभागात संमिश्र यश दोन्ही आघाड्यांना मिळालं होतं. त्यामुळे विधानसभेत अधिकाधिक जागा जिंकून मुंबईचा खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीचा आहे. अशावेळी मुंबईकर यंदा कोणाच्या बाजूने उभा राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्याआधी मुंबईकर आपला कमी मतदानाच कित्ता तर पुन्हा गिरवणार नाही ना? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मतांची टक्केवारी किती?

मतदानाची टक्केवारी ही दर दोन तासांनी निवडणूक आयोगाकडून दिली जाते. त्यानुसार आपल्याला इथे विदर्भातील मतदानाची आकडेवारी पाहता येईल.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले; "मी शर्यतीत..."

2019 विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळालेल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसला भरघोस यश

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात प्रचंड मोठं यश मिळवलं. तब्बल 13 जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा करताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा भाव हा चांगलाच वधारला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT