North Maharashtra assembly Poll live: उत्तर महाराष्ट्रात मतदानाचा टक्का किती?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

2024 North Maharashtra Assembly: उत्तर महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी
2024 North Maharashtra Assembly: उत्तर महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राज्यभरात मतदान सुरू

point

उत्तर महाराष्ट्र विभागात एकूण 47 जांगासाठी मतदान

point

पाहा उत्तर महाराष्ट्रात किती टक्के मतदान झालं

North Maharashtra Assembly live Polling 2024: नाशिक: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकूण 47 मतदारसंघांमध्ये देखील मतदान घेण्यात येत आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला आतापर्यंत चांगलं मतदान झाल्याचं अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळालंय. मात्र, यंदा नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 47 जागा आहेत. ज्यापैकी अनेक जागांवर भाजप निवडणुका लढवत आहे. त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रात भाजपची जादू कायम राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates : आचारसंहिता भंगकेल्याप्रकरणी विनोद तावडेंवर गुन्हा!

लोकसभा निवडणुकीत इतर विभागाच्या तुलनेने उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जागी भाजप आणि महायुतीला चांगलं मतदान झालं होतं. त्यामुळे सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीची मोठी भिस्त ही उत्तर महाराष्ट्रावर आहे. मात्र त्याआधी उत्तर महाराष्ट्रात नेमकं किती टक्के मतदान होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मतांची टक्केवारी किती?

मतदानाची टक्केवारी ही दर दोन तासांनी निवडणूक आयोगाकडून दिली जाते. त्यानुसार आपल्याला इथे विदर्भातील मतदानाची आकडेवारी पाहता येईल.

हे ही वाचा>> Vinod Tawde Video: विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल

2019 विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळालेल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसला भरघोस यश

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात प्रचंड मोठं यश मिळवलं. तब्बल 13 जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा करताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा भाव हा चांगलाच वधारला होता.

ADVERTISEMENT

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT