Uddhav Thackeray On Vinod Tawde: "तावडेंनी आतापर्यंतची सरकारं कशी पाडली...", उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray On Vinod Tawde
Uddhav Thackeray On Vinod Tawde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंनी विनोत तावडेंना सुनावलं

point

"पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांच..."

point

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray On Vinod Tawde:  "तावडे जर का तावडीत सापडले असतील, तर त्यांनी आतापर्यंतची सरकारं कशी पाडली आणि कशी बनवली? त्याचा सुद्धा हा पुरावा आहे. ज्यांनी हे कटकारस्थान उघडकीस आणलं असेल, तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कदाचीत त्यांचं आपआपसातील हे गँगवार सुद्धा असू शकेल. सर्व महाराष्ट्राने पाहिलं पाहिजे की यांच्या योजना कशा फसव्या आहेत. एका बाजूला बहिणीला 1500 रुपये आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या. हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय. भाजप, शिंदे आणि अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांच काही आहे का? याचा छडा आता लागला पाहिजे. हे संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र उद्या निर्णय घेईल", अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "पैसे वाटप केल्याचा व्हिडीओ निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे. पैसे वाटप केल्याचा व्हिडीओ आला असेल, तर हे जादूचे पैसे आले कुठून? कोणच्या खिशात जात होते? मी तुळजा भवानीच्या दर्शनाला माझी बॅग तपासली. मग यांच्या बॅगेतले पैसे तपासणार कोण? निवडणूक आयोगाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आयोगावार कारवाई करण्याचा वेगळा मार्ग आम्हाला बघावा लागेल. गुन्हा दाखल करून आरोपी फरार व्हायला नाही पाहिजे".

हे ही वाचा >> Vinod Tawde Vs Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूरांकडून आधी राडा, नंतर एकाच गाडीतून तावडेंना नेलं जेवायला!

नाशिकमध्ये यांच्यातील एक गट पैसे वाटताना फरार झाल्याची ऐकीव माहिती आहे. माझ्याकडे त्याबाबत काही पुरावा नाही. पण निवडणूक आयोगाने त्याबाबत अत्यंत निष्पक्षपणाने कारवाई करावी. विनोद तावडेंना पीएचडी मिळाली पाहिजे. काही राज्यात त्यांनी सरकार पाडलं. काही राज्यात त्यांनी सरकार बनवलं, यामागचं सत्य काय आहे, ते समोर आलं पाहिजे. हा भाजपचा नोट जिहाद आहे. पैसा बाटेंगे और हम जितेंगे, असं काहीसं आहे. यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. निवडणूक आयोग काय करतं? हे पाहावं लागेल. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Vinod Tawde Video: विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल

    follow whatsapp

    ADVERTISEMENT