Vinod Tawade: 'तावडेंना पकडून देण्यासाठी भाजपमध्येच कारस्थान', राऊतांचा खळबळजनक दावा

रोहित गोळे

ADVERTISEMENT

'तावडे जड होतील.. त्यांना पकडून द्यावं यासाठी भाजपमध्येच कारस्थान'
'तावडे जड होतील.. त्यांना पकडून द्यावं यासाठी भाजपमध्येच कारस्थान'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'विनोद तावडे बहुजन समाजाचा चेहरा आहे' म्हणून कारस्थान केल्याचा राऊतांचा आरोप

point

विरारमध्ये बविआ कार्यकर्त्यांचा मोठा राडा

point

विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप

Vinod Tawade: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये प्रचंड मोठा राजकीय राडा झाला आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अचानक धाड टाकून भाजप नेते विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे. या हॉटेलमध्ये लाखो रुपये देखील सापडले आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर शिवसेना (UBT) नेते संजय राऊतांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तावडे पक्षामध्ये जड होत असल्याने त्यांना पकडून देण्यासाठी भाजपमध्येच तावडेंविरोधात कारस्था रचला गेल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.

ADVERTISEMENT

'तावडे बहुजन समाजाचा चेहरा म्हणून अशा पद्धतीने पकडून देण्यासाठी भाजपमध्ये कारस्थान'

दरम्यान, या संपूर्ण राड्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ मीडियाशी संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी भाजप नेतृत्वावर देखील गंभीर आरोप केले आहेत. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले.

हे ही वाचा>> Vinod Tawde Vs Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूरांकडून आधी राडा, नंतर एकाच गाडीतून तावडेंना नेलं जेवायला!

'विनोद तावडे यांच्याकडे 15 कोटी पेक्षा जास्त रक्कम होती असं मी ऐकलंय. त्यातले 5 कोटी रुपये हे स्थानिक आमदार क्षितीज ठाकूर यांच्या ताब्यात आहेत. त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राला ही निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवली जातेय सत्ताधारी पक्षाकडून हे स्पष्ट केलंय. या सगळ्यावर आज 5 वाजता उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर आपल्याशी बोलणार आहेत.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'हितेंद्र ठाकूर यांच्याशी मी त्याच्याशी सहमत आहे. विनोद तावडे यांच्यासंदर्भात जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यानेच ठाकूरांना दिली. विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील हा बहुजन समाजाचा चेहरा आहे, राष्ट्रीय महासचिव आहे हा महाराष्ट्रातला माणूस.. त्यांच्या हातात काही सूत्रं आहेत या राज्याची.'

हे ही वाचा>> Vinod Tawde Video: विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल

'मोदी आणि शाह यांच्या जवळचा माणूस आहे. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने पकडून द्यावं यासाठी भाजपमध्ये कारस्थान झालं. ज्यांच्याकडे गृहखातं आहे त्यांच्याकडे या संदर्भात जास्त माहिती असते.' 

ADVERTISEMENT

'निवडणूक आयोग निष्पक्ष असता तर जी कारवाई कार्यकर्त्यांनी केली ती निवडणूक आयोगाने केली असती ना..' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप नेतृत्वावर गंभीर आरोप केला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT