प्रचंड मोठी बातमी... राज ठाकरेंचं ठरलं, निवडणुकीनंतर BJP सोबत जाणार...
Raj Thackeray with BJP: मनसे पक्ष हा निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार असल्याचं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार
मुख्यमंत्रीपदासाठी मनसे भाजपला देणार पाठिंबा
राज ठाकरेंनी केलं मोठं विधान
Raj Thackeray: मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर मनसे हा भाजपसोबत जाणार असल्याचं मोठं विधान स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. 'विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल... आमच्या साथीने..' असं म्हणत राज ठाकरेंनी ते निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ज्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. (maharashtra vidhansabha election 2024 bjp will become chief minister with mns support mns will go with bjp after election raj thackeray big statement)
विधानसभा निवडणुकीनंतर कोणाची सत्ता येईल आणि कोण मुख्यमंत्री होईल याबाबत बोलताना राज ठाकरेंनी हे मोठं विधान केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे.
'भाजपचा मुख्यमंत्री होईल.. आमच्या साथीने...', राज ठाकरे असं का म्हणाले?
'शिवसेनेमध्ये असताना तेव्हापासूनचं... जर समजा माझ्या आयुष्यात दुसरा कोणता पक्ष आला असेल माझ्या आयुष्यात तर तो भाजपच आला.. मग ते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे किंवा नितीन गडकरी असतील. घरी येणं जाणं हे अटलजी, अडवाणीजी यांच्याशीच संबंध आला..'
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana: 'काहीही फुकट...', लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचं सडेतोड विधान!
'माझा कधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा माझा कोणाशी संबंधच आला नाही कधीच नाही. गाठीभेटी भाग वेगळा.. पण असा कधी संबंध आलाच नाही. त्यामुळे संबंध आला तो भाजपसोबतच आला. म्हणजे संघातील अनेक माणसं असतील ज्यांचा माझ्याशी चांगला परिचय आहे. घरी येणं, भेटणं.. तसाच आला तो.'
'मला वाटतं सरकार बनेल युतीतंच... तीन महिन्यांपूर्वी असं वाटत होतं की, आघाडी-बिघाडीचं वर चाललंय पारडं वैगरे.. पण पुन्हा हरियाणाच्या निवडणुका झाल्या त्यामुळे पुन्हा चित्र बदललं. अर्थात इतकं सोप्पंही नाहीए युतीला...'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Maharashtra Politics : ना मविआ, ना महायुती... राज्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही? काय आहे तज्ञांचा अंदाज?
'मुख्यमंत्री कोण होईल... मला वाटतंय की भाजपचा मुख्यमंत्री होईल.. आमच्या साथीने...' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
मनसे लढतंय स्वबळावर निवडणूक
सध्याच्या राजकारणात मनसे हा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतंय. मात्र, असं असताना राज ठाकरेंनी हे स्पष्ट केलं आहे की, निवडणुकीनंतर ते भाजपसोबत जातील. अशावेळी आता निवडणुकीचं बरंचसं चित्र हे पालटू शकतं. कारण आतापर्यंत मनसे नेते हे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांवर टीका करत होते. मात्र, आता राज ठाकरेंच्या भाजपसोबतच्या जाण्याच्या विधानानंतर राज्यातील राजकारण हे बदलू शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होईल.
ADVERTISEMENT