Girgaon Marathi Vs Marwadi : "...अशे प्रकार खपवून घेणार नाही", मराठीला विरोध करणाऱ्याला मनसेचा चोप, मंगलप्रभात लोढा म्हणाले...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईमधील गिरगावमध्ये घडलेल्या घटनेनंतर लोढांची प्रतिक्रिया

point

मराठी नको म्हणणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेकडून चोप

Mumbai Girgaon : मुंबईतील गोरेगाव परिसरात एका व्यापाऱ्यानं स्थानिक महिलेशी मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं दोघांमध्ये शा‍ब्दिक वाद झाला. यावेळी व्यापाऱ्यानं आपल्याला थेट सांगितलं की, "आता भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे मारवाडीतच बोलायचं, मुंबई भाजपची, मुंबई मारवाडी लोकांची असं म्हणत त्या व्यक्तिनं मराठी बोलण्यास स्पष्ट नकार दिला होता." त्यानंतर या महिलेनं असाही आरोप केला होता की, आपण या प्रकरणाची तक्रार घेऊन मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गेलो असता, त्यांनीही उद्धटपणे उत्तर दिलं. त्यानंतर हे प्रकरण मनसेच्या शाखेत गेलं. त्यावेळी मनसैनिकांनी या व्यापाऱ्याला बोलवून चोप दिला. त्यानंतर आता मंगलप्रभात लोढा यांनीही या प्रकरणाची दखल घेत प्रतिक्रिया दिली. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Raj Thackeray : "आमच्याकडेही थर्ड अम्पायर असता तर, गेल्या निवडणुकीत....", सचिनसमोर काय म्हणाले राज ठाकरे?

मनसैनिकांनी संबंधित व्यापाऱ्याला चोप देत माफी मागायला सांगितली. यादरम्यानच्या व्हिडीओमध्ये तक्रारदार महिलेने मंगलप्रभात लोढा यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर आता लोढा यांनी व्यापाऱ्याच्या वर्तनुकीचा निषेध करत कुणीही भाजपचं नाव घेऊन असं करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं लोढा म्हणाले आहेत. 
 

मंगलप्रभात लोढा काय म्हणाले? 

गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध! मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे! त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला!, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे! भाजपचे नाव घेऊन, अशे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत! आपली मुंबई सर्वांची आहे!, परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. जाहीर निषेध!

 

हे वाचलं का?


दरम्यान, याप्रकरणाचा व्हिडीओ कालपासून सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतो आहे. अनेक नेत्यांनीही हा शेअर करत भाजपवर निशाणा साधल्याचं दिसलं होतं. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT