Madha Vidhan Sabha : माढा विधानसभेतून मनोज जरांगे यांचा शिलेदार मैदानात, लढणार की माघार घेणार? काय म्हणाले ऐका...
Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय नेते मंडळी मनोज जरांगे यांच्या भेटी घेताना दिसत आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे हे काय निर्णय घेतात ते पाहावं लागणार आहे. जरांगे जर विधानसभेच्या मैदानात उतरले तर राजकीय समिकरणांमध्ये मोठे बदल होतील, असं चित्र सध्या राज्यात आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माढा विधानसभेतून जरांगेंचा शिलेदार मैदानात
निवडणूक लढणार की माघार घेणार?
मनोज जरांगे कधी स्पष्ट करणार भूमिका?
Madha Vidhan Sabha : मनोज जरांगे यांनी माढा विधानसभेत आपला डाव टाकला असून, आज त्यांचा उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे हे आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आपण नाईलाजाने विधानसभेच्या मैदानात उतरावं लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी थेट विधानसभेची तयारी सुरू केली असून, त्यांच्यावतीने बरेच उमेदवार उतरवले जाणार असल्याची शक्यता आहे. कोणत्या आणि किती जागांवर लढणार हे जरी स्पष्ट नसलं तरी, मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना सर्व मतदारसंघांमधून अर्ज भरून तयार राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता जरांगे यांचे समर्थक धनाजी साखळकर हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Manoj Jarange supporter dhanaji sakhalkar to file candidature form from madha)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Kasba Vidhan Sabha : Hemant Rasne यांना उमेदवारी, धीरज घाटे नाराज, कसबा भाजपला यंदाही जड जाणार?
मनोज जरांगे हे गेल्या 14 महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर लढत आहेत, मात्र सरकारकडून दुर्लक्ष केलं जातंय. आम्ही मराठा, ओबीसी, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे मुद्दे घेऊन आम्ही गेल्या दहा वर्षांपासून लढत आहोत, त्यामुळे सर्व समाजाला घेऊन आज आम्ही अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहोत असं धनाजी साखळकर यांनी सांगितलं. तसंच या निवडणुकीसाठी आपण कुणाकडूनही एक रुपयाही घेणार नसून, स्वखर्चाने सर्व निवडणूक लढू असं मनोज जरांगे म्हणाले. तसंच जर मनोज जरांगे यांनी आम्हाला आदेश दिला, तर ही निवडणूक सर्वात मोठी निवडणूक होईल. तसंच माढा मतदारसंघातून पहिला गुलाल उधळलला जाईल, मला तब्बल 54 हजारांचं लीड मिळेल असा विश्नास धनाजी साखळकर यांनी व्यक्त केलाय.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Amit Thackeray : खळखट्याकमध्ये मनसैनिकांवर गुन्हे, तसे तुमच्यावर किती गुन्हे? अमित ठाकरे म्हणाले एकही नाही, कारण...
दरम्यान, इच्छूक उमेदवारांनी सर्व फॉर्म क्लिअर करुन अर्ज दाखल करुन ठेवा असे आदेश मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना दिला आहे. तसंच यानंतरचा निर्णय आपण लवकरच घेऊ असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वपक्षीय नेते मंडळी मनोज जरांगे यांच्या भेटी घेताना दिसत आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे हे काय निर्णय घेतात ते पाहावं लागणार आहे. जरांगे जर विधानसभेच्या मैदानात उतरले तर राजकीय समिकरणांमध्ये मोठे बदल होतील, असं चित्र सध्या राज्यात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT