Nana Patole : बदलापूरच्या 'त्या' शाळेत ब्ल्यू फिल्म बनवायचे, शरीराचे अवयव विकायचे, नाना पटोले यांचे खळबळजनक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण?

point

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे गंभीर आरोप

point

शाळेच्या संचालकांवर कारवाई करणं टाळल्याचा आरोप

बदलापूर च्या शाळेत मुलींचे ब्ल्यू फिल्म बनवायचे असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणाला पुन्हा एकदा नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला होता. त्यातच आता नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे या प्रकरणात नेमकं काही लपवलं तर जात नाहीये ना असा सवालही उपस्थित होतोय. 

हे ही वाचा >>Uddhav Thackeray : गद्दारांना मोठं केलं, चूक झाली, माफ करा... ठाकरेंनी सांगितली 'वर्षा' सोडण्यापूर्वीची इनसाईड स्टोरी

नाना पटोले हे नांदेडमध्ये प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या काळातील राज्यातील परिस्थितीबद्दल बोलताना बदलापूरच्या घटनेचा उल्लेख केला. एवढंच नाही तर या शाळेत अवयव विक्रीही करायचे असाही आरोप त्यांनी केला आहे. "ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित असून या शाळेत लहान मुलींचे अश्लील चित्रफिती तयार करणे, अवयव विक्री करणे अशा पद्धतीचे उद्योग सुरू असल्याचा" आरोप नाना पटोले यांनी एका जाहीर सभेत केला आहे. आरएसएसशी संबंधित शाळा असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी दाखवल्याचा आरोपही पटोलेंनी केलाय. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नाना पटोले काय म्हणाले?

"बदलापूरमध्ये चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाले. दोनच नाही, तर असंख्य मुलींवर अत्याचार झाला, कोर्टाने चौकशीचे आदेशही दिले, पण आरएसएसची शाळा म्हणून राज्यातल्या सरकारने त्यांच्या संचालक मंडळावर कारवाई केली नाही. एका माहितीच्या अधिकारातून एका व्यक्तिने केस केली. त्या शाळेत ब्ल्यू फिल्म, पिक्चर तयार करणे, शरिराचे अवयव विकण्याशी संबंधीत एक जनहित याचिका टाकण्यात आली आहे" असं नाना पटोले  म्हणाले आहेत.

दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला 23 सप्टेंबर रोजी दुसऱ्या एका गुन्ह्याप्रकरणी तळोजावरून  ठाण्यात आणण्यात येत होतं. त्याचवेळी मुंब्रा बायपासजवळ अचानक अक्षय शिंदेने पोलिसाची बंदूक खेचली आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्याचं समोर आलंय, ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला. ज्यानंतर पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ गोळीबार केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या एन्काऊंटरवरुनही अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. त्यातच आता नाना पटोले यांनी शाळेवर गंभीर आरोप केल्याने या प्रकरणात बरेच सवाल उपस्थित होत आहेत. 

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT