Sadabhau Khot Apologize: टीका करताना बरळलेल्या सदाभाऊंची दिलगिरी, म्हणाले ही गावाड्याची भाषा, ही भाषा समजण्यासाठी तुम्हाला...
Maharashtra Assembly Elections: शरद पवार यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या सदाभाऊ खोत यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सदाभाऊ खोत यांची दिलगिरी
टीका करताना वापरलेली भाषा गावगाड्यातली भाषा
सदाभाऊ खोत ठरले होते टीकेचे धनी
Sadabhau Khot Apologize : शरद पवार यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या सदाभाऊ खोत यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. ही गावगाड्याची भाषा आहे असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी आता याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. सदाभाऊ खोत यांनी ही टीका केल्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून टीका झालीच, मात्र खुद्द अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांना सज्जड दम दिला होता. आज संजय राऊत यांनीही त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता.
हे ही वाचा >>Supriya Sule : "फडणवीसांवर केस व्हावी, त्यांनी राजीनामा द्यावा"; अजितदादांची आर. आर. आबांवर टीका, सुप्रिया सुळे भडकल्या
सदाभाऊ खोत यांनी काल सांगलीमध्ये शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या शारिरीक व्यंगावरुन सदाभाऊ यांनी टीका केली होती. त्यांनंतर आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. "माझा कुणाच्या व्यंगावर बोलण्याचा हेतू नव्हता, ही गावगाड्याची भाषा आहे. काही लोकांनी शब्दाचा, अर्थाचा विपर्यास केला, त्यातून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो, पण गावगाड्याची भाषा समजायला मातीत रुजावं लागतं, मातीत राबावं लागतं आणि मातीमध्येच मरावं लागतं तेव्हाच गावाकडची भाषा समजते" असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सांगलीच्या भाषणात सदाभाऊ काय म्हणाले होते?
हे ही वाचा>>Sanjay Raut : "सदा खोतच्या बापानेच...", शरद पवारांवरील टीकेनंतर राऊत भडकले, हसण्यावरुन फडणवीसांवरही बरसले
Sangli Rally:"देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहिती आहे का? आपल्या घरात गाय असते तशी राज्याची तिजोरी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे लोक घेरतायत, कारण देवेंद्र फडणवीस म्हणत होते गायीचं सगळं दूध वासरांचं आहे, मी सगळं दूध वासरांना देणार, मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या, ते म्हटले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं... पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या... पण तरी पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?" अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. यावेळी मंचावर गोपीचंद पडळकर आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. सदाभाऊ खोत यांचं भाषण ऐकताना पडळकर आणि फडणवीस दोघेही हसत होते, त्यावरुन संजय राऊत आणि अमोल मिटकरींनीही निशाणा साधलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT