Amol Mitkari : बोलणारा आणि हसणारे दोघेही.... शरद पवार यांच्यावर सदाभाऊंची टीका, मिटकरी मोजक्या शब्दात बोलले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सदाभाऊ खोत यांची पवारांवर खालच्या भाषेत टीका

point

पवारांवरील टीकेनंतर अजित पवारही संतापले

point

अमोल मिटकरींची मोजक्या शब्दात सूचक इशारा

Sadabhau Khot controversial Statement : सांगली जिल्ह्यातील जतमध्ये काल गोपीचंद पडळकर यांच्यासाठी भाजपची सभा पार पाडली. या सभेमध्ये सदाभाऊ खोत यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या महायुतीमध्ये असलेल्या पक्षांनीही सदाभाऊ खोत यांच्यासह गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतयं. शरद पवार म्हणत असतात की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, तर त्यांना तो त्यांच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. शरद पवार यांच्यावर अशी टीका झाल्यानं आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही संताप व्यक्त केला जातोय. (amol mitkari reaction on sadabhau khot criticized sharad pawar)

 

हे ही वाचा >>Ajit Pawar: 'पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन...', अजितदादा खोतांवर प्रचंड संतापले!

 

गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते काल सांगलीमध्ये होते. सदाभाऊ खोत यांनी आपल्या खास शैलीत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, शरद पवार आता म्हणतायत की मला महाराष्ट्राचं चेहरा बदलायचाय, त्यांना महाराष्ट्राचा चेहरा त्यांच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का? असं सदाभाऊ खोत म्हणाले. यानंतर अजित पवार यांनी या टीकेला उत्तर दिलं. तसंच अमोल मिटकरी यांनीही आता मोजक्या शब्दात आपला संताप व्यक्त केल्याचं दिसतंय. अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, "बोलणारा आणि हसणारे दोघेही लक्षात ठेवतो आहोत. तुर्तास इतकेच.....!". अमोल मिटकरी यांनी या पोस्टमध्ये सदाभाऊ खोत यांनी पवारांवर बोलतानाचा व्हिडीओ टाकला आहे. यावेळी गोपीचंद पडळकर हसत आहेत, तर मंचावर देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे मिटकरींनी सर्वांवरच निशाणा साधल्याचं बोललं जातंय. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT


यापुढे खपवून घेणार नाही, अजितदादांचा सज्जड दम 

 

सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेचा अजित पवार यांनी निषेध केला. अजित पवार म्हणाले की, "ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीचं व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणं आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका  केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही.

सदाभाऊ खोत नेमकं काय बोलले होते? 

 

देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहिती आहे का? आपल्या घरात गाय असते तशी राज्याची तिजोरी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे लोक घेरतायत, कारण देवेंद्र फडणवीस म्हणत होते गायीचं सगळं दूध वासरांचं आहे, मी सगळं दूध वासरांना देणार, मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या, ते म्हटले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं... पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या... पण तरी पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT