Prakash Ambedkar : ...तर अजित पवारांनी आमच्यासोबत यावं, प्रकाश आंबेडकरांनी का दिली ऑफर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रकाश आंबेडकरांची अजितदादांना ऑफर

point

बटेंगे तो कटेंगेवरुन काय म्हणाले आंबेडकर?

point

दोन भूमिका घेणं ही महायुतीची चाल?

Prakash Ambedkar on Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर आलं आहे, अशातच आता प्रचाराने जोर धरला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी नेत्यांची मोठी फौज सध्या मैदानात आहे. अशातच योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा दिली. या घोषणेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. विरोधकांकडून या घोषणेला विरोध झालाच, मात्र महायुतीचे महत्वाचे घटक असलेल्या अजित पवार यांनीही या घोषणेला विरोध केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या याच विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Sharad Pawar : ...म्हणून मी भुजबळांना मुख्यमंत्री करणं टाळलं, पवारांचं खळबळजनक विधान, अजितदादांवरही निशाणा

प्रकाश आंबेडकर यांनी 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवरुन योगी आदित्यनाथ यांच्यावर तर एक हैं तो सेफ हैं म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. तसंच अनेक है तो अखंड है असं म्हणणाऱ्या ओवैसींच्याही घोषणेचा अर्थ तोच आहे असं आंबेडकर म्हणाले. त्यांनी सांगितलं की,  घोषणांचा अर्थ एकच असून, ते मुस्लिमांकडे निशाणा करत आहेत. ते म्हणत आहेत की, एक राहाल तोपर्यंत मुस्लिमांपासून वाचाल. मात्र मी या नेत्यांना विचारू इच्छितो की, ओबीसी आरक्षण काढणारे किंवा मराठा आरक्षण लागू करणारे हे मोदींचंच सरकार आहे, मग आरोप मुस्लिमांवर का? या चुकीच्या प्रचाराची समज लोकांना आली आहे, त्यामुळे ते अशा प्रचारावर ते विश्वास ठेवणार नाहीत असं आंबेडकर म्हणाले.

"अजित पवारांचा विरोध ही चाल"

अजित पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध करणं ही महायुतीची चाल आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. तसंच जर अजित पवार यांचं धोरण वेगळंच असेल, तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं. ते बाहेर पडले तर आम्ही त्यांच्यासोबत घ्यायला तयार आहोत, त्यांच्या सोबत बसायला तयार आहोत. 



अजित पवारांचा मतांसाठीचा प्लॅन?

महायुतीचे तीन पक्ष सध्या राज्यात जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष महायुतीचा अजेंडा पुढे घेऊन जात असताना मुस्लिम आणि दलित समाजाला सोबत घेण्यासाठी अजित पवार यांच्यामाध्यमातून एक वेगळा अजेंडा चालवला जात असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

अजित पवार यांच्यावर सध्या त्यांच्याकडे असलेला पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे हे सिद्ध करण्याचं मोठं आवाहन आहे. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी पूर्णपणे पाळण्याचाही प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. तसंच त्यांच्या पक्षाकडे असलेल्या मुस्लिम उमेदवारांवरही त्यांना लक्ष ठेवावं लागणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. ही सगळी गणितं साध्य करण्यासाठी अजित पवार सध्या जोरदार तयारी करत असल्याचं दिसतंय. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT