Raj Thackeray: "बांगलादेशातून आलेले जास्तीत जास्त मुसलमान...", चेंबूरच्या सभेत राज ठाकरेंनी केलं मोठं आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray Latest Speech
Raj Thackeray Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंनी मराठी लोकांना केलं मोठं आवाहन

point

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर हल्लाबोल

point

चेंबूरच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray Latest Speech : "कालच एक रिपोर्ट आला आहे. रिपोर्टमध्ये असं दिलंय की, बांगलादेशातून आलेले जास्तीत जास्त मुसलमान आणि म्यानमारवरून आलेले रोहिंगे यांचं भविष्यातील प्रमाण पुढच्या दहा-पंधरा वर्षात एव्हढं वाढणार आहे की मुंबईतील हिंदू जवळपास 49 टक्क्याच्या खाली येणार आहे आणि यांचं प्रमाण 52 टक्क्यांच्या वर येणार आहे. ही कोण माणसं आहेत? काय करणार आहेत? कशासाठी येणार आहेत? याचा काहीच पत्ता नाहीय. हे उमेदवार उभे आहेत, त्यांना ही माणसं मदत करतात. त्यांना रेशन कार्ड काढून द्या. त्यांना आधारकार्ड काढून द्या. त्यांना वोटिंग कार्ड काढून द्या. उद्या ही माणसं इथे बसायला लागली की मग तुमचं काही खरं नाही, हे लक्षात ठेवा. मग आपले पोलीस अधिकारीही काही करू शकणार नाहीत, असं मोठं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चेंबूरच्या सभेत केलं.

ADVERTISEMENT

राज ठाकरे पुढे म्हणाले, "हे जे उमेदवार उभे आहेत, यांचा हेतू लक्षात घ्या, हे धोके नीट लक्षात घेण्याची गरज आहे. तुम्हाला या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एकदा हातातून गेलं की परत मिळत नाही. इथे काय काय प्रकार घडत आहेत, हे आमच्या पोलिसांना माहिती आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये अशाप्रकारची माणसं निवडून गेली, तर अणुशक्तीनगर चेंबूर हा भाग बर्बाद झाला म्हणून समजा. अणुशक्तीनगरमधील निवडणूक सर्वात महत्त्वाची आहे. 20 तारखेपर्यंत कुणीही बेसावध राहू नका. 

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "मी भाजपला लाथ मारली, पण...", मालवणच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

"तुम्हाला 1993 चे बॉम्बब्लास्ट आठवतात ना? इथल्याच लोकांनी घडवले. जी माणसं आपण आपली म्हणत होतो. त्यांनी आपल्याकडची माणसं बॉम्बस्फोट करून मारली. ही माणसं कोणाचीच नसतात. ही त्यांच्या स्वत:च्या धर्माच्या पलीकडे पाहतही नाहीत. आपणच माणुसकी माणुसकी म्हणून दाखवतो. मग तो बांगलादेश, म्यानमार नाहीतर पाकिस्तानातून येऊदे. त्याला हे लोक आपला म्हणणार, असंही राज ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : "वडिलांना झालेल्या वेदना मी...", रक्ताच्या नात्याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलले

पूर्वीच्या काळात सर्व चांगलं होतं. पण 25-30 वर्षात सर्व गोष्टी बिघडल्या. यांची डोकी फिरली आहेत. हे फक्त भारतात होतं असं नाही. जगभर हीच गोष्ट होत आहे. दोन्ही राष्ट्रवादी कोणते घंदे करतात. या लोकांना उभं करून काय कृत्य करतात. जे उमेदवार उभे राहतात ते बाहेरच्यांना थारा देत आहेत. ही माणसं राष्ट्रवादीची असूच शकत नाहीत. आता तुम्ही घराघरात पोहचा आणि धोका लोकांना सांगा, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT