Raj Thackeray: "उद्धव ठाकरे आजारी असताना रुग्णालयात गाडी घेऊन जाणारा मीच...", राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्र
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्र
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार

point

"अमित ठाकरेंना नक्की निवडून आणणार..."

point

राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

Raj Thackeray On Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. माहिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी अमित ठाकरेंविरोधात मोर्चेबांधणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीय. "ज्यावेळी उद्धव आजारी पडला, त्यावेळी मी स्वत: गाडी घेऊन गेलो होतो. मी अलिबागला होतो, तेव्हा मला बाळासाहेबांचा फोन आला होता. त्यांनी मला याबाबत सांगितलं होतं. मी परिवाराच्या आड राजकारण कधी येऊ दिलं नाही", असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 

ADVERTISEMENT

काय म्हणाले राज ठाकरे? 

"ज्यावेळी उद्धव आजारी पडला, त्यावेळी मी स्वत: गाडी घेऊन गेलो होतो. मी अलिबागला होतो, तेव्हा मला बाळासाहेबांचा फोन आला होता. त्यांनी मला याबाबत सांगितलं होतं. मी परिवाराच्या आड राजकारण कधी येऊ दिलं नाही. वरळीला आदित्या जेव्हा गेल्यावेळी उभा होता. तिकडे 38 हजार मतं आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. आमच्या कुटुंबातील पहिला उमेदवार तिथे उभा राहतोय, म्हणून मी तिथे उमेदवार दिला नाही. ही माझ्या मनात आलेली गोष्ट होती.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : "वडिलांना झालेल्या वेदना मी...", रक्ताच्या नात्याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलले

मी कुणाला फोन नाही केला, मी उमेदवार देत नाही म्हणून मला पुढच्या वेळी सांभाळून घ्या. अशी भीख मी मागत नाही. माझ्याकडून चांगूपणाच्या जेव्हढ्या गोष्टी होतील, तेव्हढ्या मी केल्या. आज अमित उभा राहत असतानादेखील मी भीख मागणार नाही. मी या लोकांना मागील निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी माझ्या मनातही नव्हतं की अमित निवडणुकीला उभा राहील. त्याच्याही मनात नसेल. जे समोर उभे असतील त्यांच्याशी लढू.. निवडून नक्की आणणार."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Uddhav Thackeray Exclusive : मुख्यमंत्रिपदाचा विषय काढताच ठाकरेंनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडंचं नाव का घेतलं?

अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत आहे. मुंबईच्या प्रभादेवीत राज ठाकरेंची सभा होणार आहे. अमितसाठी मतांची भीक मागणार नाही, तर निवडून आणेल, असं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना रुग्णलायत गाडी घेऊन जाणारा मीच होतो. 2019 मध्ये आदित्य उभा होता, तेव्हा मोठ्या मनाने उमेदवार दिला नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT