Uddhav Thackeray: "मी भाजपला लाथ मारली, पण...", मालवणच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray On Pm Narendra Modi
Uddhav Thackeray On Pm Narendra Modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंनी मोंदीना दिलं खुलं आव्हान

point

उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे नारायण राणेंवर केली खरमरीत टीका

point

मालवणच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Uddhav Thackeray On PM Narendra Modi:  "मोदीजी तुम्ही लोकसभा निवडणुकीत कंठशोष करत होता. परिवारवाद, घराणेशाही म्हणता, शिवसेनाप्रमुखांनी मला शिवसेना दिली आहे. मोदीजी तुमचं काय जातंय? कोण आहात तुम्ही? हिंदूत्व माननारी आणि संकटात साथ देणारी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांची घराणेशाही तुम्हाला चालत नाही. पण माझ्या कोकणावर गुंडागर्दी, जबरदस्ती करणारी घराणेशाही चालते. एव्हढे तुम्ही खाली उतरलात. मग तुम्ही तिकडे कशाला बसला आहात? हे आमचं हिंदुत्व नाही. मी भाजपला लाथ मारली आहे. मी हिंदूत्व सोडलं नाही आणि कदापी सोडू शकत नाही", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते तळ कोकणातील मालवणमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सभेत बोलत होते.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "हा पक्ष माझ्या वडिलांनी स्थापन केला आहे. तेव्हा तुम्ही हिमालयात होता की मिंधे पर्वतात होता? मला माहिती नाही. मुंबईत मराठी माणसांवर अन्याय होत होता, तेव्हा भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांनी ही शिवसेना स्थापन केली. या शिवसेनेचं नेतृत्व करण्यास शिवसेनाप्रमुखांनी संमती दिली असेल, तर तुम्ही चोमडेपणा करणारे कोण?" असा सवाल पस्थित करत ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. 

हे ही वाचा >>  Uddhav Thackeray : "वडिलांना झालेल्या वेदना मी...", रक्ताच्या नात्याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलले

तुम्हाला शिवसेना प्रमुखांची घराणेशाही चालत नाही. परिवारवाद म्हणता मग इकडे तुम्ही जे करत आहात, बाप डोक्यावर आणि पोरं खांद्यावर. डोक्यावर बाप बसलाय. एका खांद्यावर एक कारटं आणि दुसऱ्या खांद्यावर दुसरं कारटं, असं म्हणत ठाकरेंनी नाव न घेता खासदार नारायण राणेंवर टीका केली. काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक मित्रपक्ष आमच्यासोबत आहेत. कारण तुमची हुकूमशाही गाडायला आम्ही एकत्र आलो आहोत. आम्हाला हुकूमशाही नको, असंही ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Vidhansabha Election 2024: 'मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक...', राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य!

आम्हाला शिवशाही पाहिजे. म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. यावेळी नेमकं काय चुकलं, हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. नको तो धोंडा पुन्हा उरावर का घेतला..पुन्हा गुंडगिरी, दादागिरी..मोदींना इकडे मुद्दामहून प्रचाराला बोलवायचं आहे. मोदीजी इकडे व्यासपीठावर या आपण बोलू, असं म्हणत ठाकरेंनी राणेंसह मोदींवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT