Raosaheb Danve : महायुतीत मिठाचा खडा, शिंदेंच्या नेत्याला रावसाहेब दानवे औरंगजेब म्हणाले, तर स्वत:ला थेट शिवरायांची उपमा
माजी केंद्रीय मंत्री आणि भादप नेते रावसाहेब दानवे यांना अब्दुल सत्तार यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मला तुम्ही औरंगजेबाद्दल का पश्न करता, मी शिवाजी आहे असं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांच्यावर बरसले
अब्दुल सत्तार यांना दिली थेट औरंगजेबाची उपमा
रावसाहेब दानवे का संतापले? नेमकं काय घडलं?
राज्यात सध्या मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जातेय, फटाके फोडले जातायत. तर दुसरीकडे राजकारणात सुद्धा रोज नवे बॉम्ब फुटताना दिसत आहेत. राज्यात सध्या नेत्यांच्या लढती चर्चेत आहेत. तर तिकडे जालना जिल्ह्यात गेल्या काही काळापासून अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वादही चांगलाच चर्चेत आहे. त्यातच एका टीव्ही चॅनलवरील मुलाखतीत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांना अब्दुल सत्तार यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी "मला तुम्ही औरंगजेबाद्दल का पश्न करता, मी शिवाजी आहे" असं विधान केलं आहे. (Raosaheb Danve targets Abdul sattar amid vidhan sabha)
ADVERTISEMENT
हे ही वाचा>>Ajit Pawar : ...म्हणून आम्ही वेगळा पाडवा साजरा करायचा निर्णय घेतला, अजित पवार यांनी सांगितलं कारण
कन्नड, सिल्लोड आणि फुलंब्रीमध्ये महायुतीचा धर्म पाळला जाणार का असा प्रश्न विचारताच संतापलेल्या रावसाहेब दानवे म्हणाले की, "सत्तार काय बोलतात ते सोडा... औरंगजेब काय बोलतो, ते मला शिवाजीला कशाला विचारता? सत्तार औरंगजेब आहे आणि मी शिवाजी आहे. अब्दुल सत्तार यांना सिल्लोडच्या लोकांवर एक छाप टाकायची आहे... पण ते या निवडणुकीत चालणार नाही" असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे. स्वत:ची तुलना छत्रपती शिवरायांशी आणि अब्दुल सत्तार यांची तुलना थेट औरंगजेबाशी केल्यानं रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत.
हे ही वाचा>>Ladki Bahin Yojana : डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरचे देऊ, 1500 रुपयांवरच थांबणार नाही तर... एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांची मैत्री यापूर्वी चर्चेचा विषय असायचा. मात्र लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या या मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला, कारण या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी त्यांना मदत न करता कल्याण काळे यांना मदत केल्याची चर्चा होती. या पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर रागही व्यक्त केला होता. यापूर्वीही त्यांनी अब्दूल सत्तार यांच्यावर अशीच काहीशी टीका केली होती. सत्तार यांच्यावर निशाणा साधताना सिल्लोडचा एक दिवस पाकिस्तान होईल असं वक्तव्य रावासाहेब दानवे यांनी केलं होतं.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT