Shiv Sena Minister List: शिंदेंनी 'या' नेत्यांना दिली संधी, पाहा शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

पाहा शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी!
पाहा शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपुरात होणार फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार

point

शिवसेनेचे 12 मंत्री असणार मंत्रिमंडळात

point

पाहा शिवसेनेच्या मंत्र्यांची नेमकी यादी

Maharashtra Shiv Sena Minister list: नागपूर: महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा जम्बो मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडत आहे. ज्यामध्ये जवळजवळ 37 ते 38 मंत्री हे शपथ घेणार आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे 11 मंत्री शपथ घेऊ शकतात. ज्याची यादी आता समोर आली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेकडून अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. (eknath shinde give a chance ministerial berths to these shiv sena leaders see the list of shiv sena ministers)

ADVERTISEMENT

शिवसेनेचे 12 आमदार होणार मंत्री

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून आघाडीतील पक्षांमध्ये जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद हवं होतं. कारण त्यांच्याच नेतृत्वात महायुतीने विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. पण भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळविल्यामुळे एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं.

हे ही वाचा>> Maharashtra Cabinet Expansion LIVE: पंकजा मुंडे, नितेश राणे, आशिष शेलार आणि... फडणवीस मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्यांची यादी

दरम्यान, आता शिवसेनेच्या कोट्यातून 12 आमदार हे फडणवीस मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

हे वाचलं का?

'या' पाच आमदारांना पुन्हा मंत्रिपद

  1. उदय सामंत, कोकण  
  2. शंभुराज देसाई, पश्चिम महाराष्ट्र
  3. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
  4. दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र 
  5. संजय राठोड, विदर्भ 

शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी 'हे' नवे चेहरे

  1. संजय शिरसाठ, मराठवाडा 
  2. भरतशेठ गोगावले, रायगड
  3. प्रकाश अबिटकर, पश्चिम महाराष्ट्र
  4. योगेश कदम, कोकण 
  5. आशिष जैस्वाल, विदर्भ
  6. प्रताप सरनाईक, ठाणे
     

हे ही वाचा>> Maharashtra Cabinet Expansion LIVE: पंकजा मुंडे, नितेश राणे, आशिष शेलार आणि... फडणवीस मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्यांची यादी

शिवसेनेच्या 'या' मंत्र्यांचा पत्ता कट

  • दीपक केसरकर 
  • तानाजी सावंत 
  • अब्दुल सत्तार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT