Chhagan Bhujbal: "मला मंत्रिपदाची एवढी हाव असती, तर..."; छगन भुजबळ 'हे' काय बोलून गेले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मंत्रिपदाबाबत छगन भुजबळ यांनी दिली मोठी प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal Latest Speech : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार पार मडला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात डावललं. त्यानंतर भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ अजितदादांची साथ सोडणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अशातच छगन भुजबळ यांनी जनतेला संबोधीत करताना मोठं भाष्य केलं आहे. "मी निवडून येणं किंवा मंत्री होणं, एवढच माझं काम नाहीय. मला मंत्रिपदाची एवढी हाव असती, तर मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग 17 नोव्हेंबरला जालन्यातील आंबडला जाहीर सभेसाठी आलो नसतो मी. पहिल्यांदा राजीनामा दिला. समीर भाऊंना सारखे फोन येते होते, त्यांना सांगत होते, राजीनाम्याचा उल्लेख करू नका. मी नाही केला उल्लेख. एखाद्या समाजासाठी शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजेत. लाडक्या बहिणींसोबत या ओबीसी समाजाने महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून दिलं आहे", असं भुजबळ म्हणाले. 

ADVERTISEMENT

आम्ही कुणाला विरोध केला नाही. ज्यावेळी आरक्षण सुरु झालं, तेव्हा फक्त 250 जाती होत्या. आता पावणे चारशे जाती आहेत. पण आम्ही लढलो आणि आता पुन्हा निवडणुकीला उभे राहिलो. तुम्हाला जर निवडून यायचं असेल, तर त्या मतदारसंघात तुमचं काम मजबूत पाहिजे आणि सर्व समाजाचा सपोर्ट पाहिजे. जर एखाद्या पक्षाचा सपोर्ट असेल, तर ते अधिक चांगलं असतं. राजकारणात अजूनही मला असं वाटतं की आपलं माणसं थोडीसी कच्ची दिसतात. जे निवडून येतात ते अजिबात एक शब्दही बोलत नाहीत. त्यांना माहिते आपण जर बोललो तर लोक आपल्याला निवडून देणार नाहीत. त्यांचं चुकतंय असं मी समजणार नाही. 

हे ही वाचा >> Viral Video: मुंबईच्या AC ट्रेनमध्ये खळबळ! नग्न अवस्थेत असलेला पुरुष चढला महिलांच्या डब्ब्यात, महिलांनी आरडाओरडा करताच...

जे लोक आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सर्वांना विरोध करणं तुमचं आमचं काम राहणार आहे. त्यांना ठणकावून सांगावं लागेल, पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरं जाळा, हॉटेल जाळा..शिक्षणसंस्था जाळा..अजिबात होता काम नये. सहन करू नका. आपण मराठीविरोधी नाही, हे त्यांच्या लक्षात आणून द्या. मराठा समाजाच्या आरक्षणाला आपण कधीही विरोध केला नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ही माझी पहिली मागणी होती. आम्ही एक जरी असले, तर सेफ आहोत. हम एक है तो सेफ है.. हिंदू, मुस्लिम आम्ही सर्व सेफ आहोत", असंही छगन भुजबळ म्हणाले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> 18 November 2024 Gold Rate: आरारारा! ग्राहकांसाठी लॉटरीच; सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा झाली मोठी घसरण

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT