Mumbai North West Lok Sabha : कीर्तिकरांना मतमोजणी केंद्रावरील CCTV फुटेज का दिले नाही? अधिकारी म्हणाल्या...

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ravindra waiker amol kirtikar mumbai north west lok sabha election commission returning officer vandana suryvanshi press
ईव्हिएम अनलॉक करायला ओटीपी लागत नाही.
social share
google news

ECI Returning Officer Vandana Suryavanshi : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर शेवटच्या क्षणी गोंधळ झाल्याप्रकरणी ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी सीसीटीव्हीची मागणी केली होती. मात्र मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने मतदान केंद्रातील सीसीटीव्ही देण्यास नकार दिला होता. मात्र सीसीटीव्ही देण्यास नेमका का नकार देण्यात आला होता? याची माहिती आता रिटर्निंग ऑफिसर वंदना सुर्यवंशी (Vandana Suryavanshi) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.  (ravindra waikar amol kirtikar mumbai north west lok sabha election commission returning officer vandana suryvanshi press) 

वंदना सुर्यवंशी म्हणाल्या की,  इलेक्शन ही स्टेट्युरी प्रोसीजर आहे, तिथे कुठल्याही कायदेशीर तरतूदीचे पालन न करता गोष्टी करता येत नाही. आता निवडणूक संपल्यानंतर जे मटेरीयल असते, संवैधानिक आणि असंवैधानिक लिफाफे आणि सीसीटीव्ही ही सगळी सामग्री डीओंकडे जमा केली जाते. ती कोर्टाच्या आदेशानुसार कुणालाही बघता येत नाही. त्यामुळे कोर्टाची ऑर्डर आल्याशिवाय कुणालाही सीसीटीव्ही फुटेज पाहता येणार नाही, आम्हाला देखील नाही,असे सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : भाजपसाठी गडचिरोली विधानसभा जिंकणे अवघड? काँग्रेसची स्थिती काय?

वंदना सुर्यवंशी यांच्यावर वायकरांची मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. काऊंटीगपासून ते रिझर्ल्ट जाहीर होईपर्यत मी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केले आहे. याच्यानंतर कुणी आरोप करतो हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे वंदना सुर्यवंशी म्हणाल्या आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गुरवांचा फोन वायकर यांच्या नातेवाईकांकडे कसा सापडला?

ईव्हीएम स्टॅड अलोन डिवाईस आहे, त्यात कुठलीही वायर आणि वायरलेस प्रोव्हिजन नाहीत. आणि ईव्हीएम अनलॉक करायला ओटीपी लागत नाही. त्यामुळे ही बातमी धांदात खोटी असल्याचे रिर्टनिंग ऑफिसर यांनी म्हटले आहे. ही अत्यंत चुकीची बातमी आहे. कोणतेही तपासणी न करता बातम्या दिल्याबदद्ल आम्ही मिड डे वर्तमानपत्राला नोटीसीही बजावली आहे. सेक्सन 499  बदनामी आणि 505 अफवा पसरवल्या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचेही रिर्टनिंग ऑफिसरने म्हटले आहे.

इनकोअर ही सिस्टम आहे, जिथे डेटा वेबसाईटवर अपडेट केला जातो. त्याचा ईव्हीएमशी काही संबंध नसतो. ही ईसीआयची डेटा कंपायलेशन सिस्टम असते. त्या सिस्टमवर ओटीपी येण्यासाठी आपण काही लोकांना मोबाईलची परवानगी देतो. ही परवानगी आम्ही गुरवला दिली होती. ही परवानगी त्याच्या जवळ असलेल्या मोबाईल फोनला होती,असे रिर्टनिंग ऑफिसरने स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Narayan Rane : कोकणात राणे-सामंतांमध्ये बॅनर'वार'; महायुतीत संघर्षाच्या ठिणग्या

तसेच गुरव यांच्या जवळ असलेला फोन वायकर यांच्या नातेवाईकांकडे कसा सापडला? हा चौकशीचा भाग आहे. आणि गुरवने जो मोबाईल त्यांना दिला होता तो कोणत्या कंपनीचा होता हे पोलीसच सांगू शकतात. पण आम्ही त्याच्यावर एफआयआर केले आहेत आणि त्याला निलंबित केले आहेत, असे रिर्टनिग ऑफिसर यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT