Mumbai Tak Chavadi: 'मविआच्या पराभवाचं नेमकं कारण काय?'; अंबादास दानवे म्हणाले, "EVM मध्ये बऱ्याच ठिकाणी..."

नरेश शेंडे

ADVERTISEMENT

Ambadas Danve Mumbai Tak Chavadi Interview :
Ambadas Danve Mumbai Tak Chavadi Interview :
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई तकच्या चावडीत अंबादास दानवेंचं मोठं विधान

point

"आमच्यातून गेलेल्या गद्दार लोकांनी सत्ता साधनांचा..."

point

अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

Ambadas Danve Mumbai Tak Chavadi Interview : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीने 235 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. दुसरीकडे महाविकास आघाडीला पन्नास जागाही जिंकता न आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. ईव्हीएमच्या मतमोजणीच्या प्रश्नावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे. अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुंबई तकच्या चावडीत मोठं विधान केलं. 

ADVERTISEMENT

मुंबई तकच्या चावडीत अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले? 

एक कारण बोलता येणार नाहीत. कारणं अनेक आहेत. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातून गेलेल्या गद्दार लोकांनी सत्ता साधनांचा अतिरेकी वापर केला. सर्व सामान्य मतदारांना..मला वाटतं प्रशासकीय यंत्रणेचा मतदारांवर प्रभाव पडेल असा वापर..ईव्हीएमध्ये बऱ्याच ठिकाणी मतमोजणीत असलेली तफावत...कारण विधानसभेची जागा 50 हजार लाख मतांनी निवडून येऊ शकत नाही. विधानसभेची जागा पाच, दहा, पंधरा हजारांनी निवडून येऊ शकते. एखाद्या मोठ्या नेत्याची येऊ शकते. पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जागा लाखाच्या फरकाने निवडून येत नाहीत. हे सगळे महत्त्वाचे घटक याला कारणीभूत आहेत, असं स्पष्टपणे दिसतंय.

अंबादास दानवे पुढे म्हणाले, "सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या यशानं आम्ही हुरळून गेलो. हे ही नाकारता येत नाही. विधानसभेचा मतदान बाकी आहे, हे ही बऱ्याच जणांच्या लक्षात आलं नाही. लोकसभेत उद्धव ठाकरेंनी अतिशय प्रभावी भूमिका निभावली. 2019 ला ज्या काँग्रेसची एक जागा होती, त्या काँग्रेसच्या 13 जागा झाल्या. आमच्या 9 जागा आल्या. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असला पाहिजे, अशी भावना शिवसैनिकांसह जनतेची होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Eknath Shinde News: "एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, कारण...", शिवसेनेच्या 'या' नेत्यानं सांगितलं सर्व प्लॅनिंग

कारण त्यांनी चांगल्या पद्धतीनं सरकार चालवलं. शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती, कोविडच्या काळात असे अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्रातले कुटुंबप्रमुख अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली होती. पण आमची आघाडी याबाबतीत तयार नव्हती आणि वेगळ्या भूमिका मांडत होत्या. आम्ही जागा लढत असू किंवा नसू, आमचं शिवसेनेचं संघटन खालच्या बुथपर्यंत आहे. त्या संघटनेला ताकद द्यायची असेल, तर त्याचा नेता या राज्याचा मुख्यमंत्री होणार हे उघडंपणे करण्याची आवश्यकता आहे, पण ते झालं नाही, असं मला वाटतं".

हे ही वाचा >> Nana Patole :"जनतेची मतं चोरण्याचा आणि डाका टाकण्याचं काम...", नाना पटोलेंनी सांगितली A to Z स्टोरी

महायुतीला बहुमत मिळण्याबाबत दानवे म्हणाले, "भाजपचे लोक खासगीत सांगत होते की आमचं बहुमत येईल. 170-180 जागा येतील. पण त्यांना तरी कुठे वाटलं, 230-235 जागा येतील. बहुमत नाही मिळालं हे समजू शकतो. पण 130 पर्यंत तरी जायला पाहिजे होतं. हे सर्व घटक असते तर या गोष्टी झाल्या असत्या. तुमचा ईव्हीएमवर एव्हढा रोष का? यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, हे सगळीच जनता म्हणते. जिंकून आलेले सुद्धा शॉकमध्ये आहेत. मी 50-70 हजार, लाखांनी कसा निवडून आलो, हे पाहून ते सुद्धा शॉकमध्ये आहेत. त्यांचा कुठेही उत्सव, मिरवणूक झाली नाही. रस्ताही सुन्न आहे. कारण हे सरकार पडणार, अशी पूर्ण गॅरंटी जनतेच्या मनात होती. भाजप-शिंदे गटाच्या विजयाचा उत्स्फुर्तपणा कुठेही दिसला नाही. याचं कारण असं की, हा धक्कादायक निकाल आहे, असंही दानवे म्हणाले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT