Maharashtra Election 2024: ठाकरे-पवारांची मोठी खेळी, निकालाआधीच उमेदवारांना थेट...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar And Uddhav Thackeray Meeting
Sharad Pawar And Uddhav Thackeray Meeting
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निकालाआधीच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये खलबतं!

point

विधानसभा निकालानंतर होणार मोठी उलथापालथ?

point

दोन्ही आघाड्यांना निवडणुकीत घोडेबाजार होण्याची भीती

Sharad Pawar And Uddhav Thackeray Meeting:  राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी 23 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्रीपदावरून महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून अनेक नेत्यांची नावं समोर आली आहेत. अशातच मविआ सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार आणि शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांसोबत ऑनलाईन मिटिंग घेतली आणि त्यांना 'सेफ्टी मंत्र' दिला.

ADVERTISEMENT

राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार, शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही मागील निवडणुकीत धक्कादायक अनुभवांना सामोरं जावं लागलं. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी बंडाचा झेंडा फडकवला आणि सरकार पाडलं. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवारांना राजकीय धक्का दिला आणि ते महायुतीत सामील झाले. शिंदे आणि अजित पवारांमुळे राज्यात दोन गट निर्माण झाले आणि राज्यातील निवडणुकीच्या समीकरणांना पूर्णपणे बदललं.

हे ही वाचा >> Assembly Elections Exit Poll 2024 : सरकार 'यांचं' येणार! 'या' एक्झिट पोलने कोणाची उडवली झोप?

अशातच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते सावध भूमिका घेत असून आमदारांना सतर्क राहण्याचं आवाहन करत आहेत. कारण मागील काही निवडणुकांमध्ये घोडे बाजार झाल्यामुळे राजकीय उलथापालथ झाली होती. याच कारणामुळे आघाडीचे नेते सावध झाले असून आमदारांना आपल्या बाजूला ठामपणे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निकालाआधीच महाविकास आघाडी सतर्क

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा अधिकृतपणे घोषित केलेला नाही. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, निकालाआधी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांचे नेते आणि उमेदवारांसोबत ऑनलाईन मिटिंग घेतलीय. शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील रणनीतीसाठी मविआ मुंबईत बैठक घेणार असल्याचंही समजते. 

हे ही वाचा >>  Maharashtra Election 2024: राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? निकालाआधीच MVA आणि महायुतीच्या नेत्यांची नावं समोर

निकाल लागल्यानंतर आमदार जाणार मुंबईला

दोन्ही गटाने जिंकणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबईत निवासी व्यवस्था केल्याचं सांगितलं जात आहे. मविआच्या विजयी झालेल्या आमदारांनी महायुतीच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, अशा सूचना ठाकरे-पवारांनी दिल्या आहेत. उमेदवारांना सांगण्यात आलंय की, महायुतीच्या नेत्यांच्या कोणत्याही अमिषाला बळी पडून दबावात राहू नका. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT