Sharad Pawar : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पवारांनी संपवला गोंधळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?

point

विधानसभा निवडणुकीत मविआचा चेहरा कोण असेल?

point

शरद पवार संजय राऊतांच्या विधानाबद्दल काय बोलले?

Sharad Pawar Uddhav Thackeray : (दिपक सूर्यवंशी, कोल्हापूर) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली आणि बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीतही जागावाटपाबद्दल चर्चा सुरू आहेत. अशात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी एक विधान केले की, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोरे जायला नको. राऊतांच्या याच विधानावर बोलताना शरद पवार यांनी एक महत्त्वाचे विधान केले. (Sharad Pawar about will Uddhav Thackeray be the chief ministerial face of Maha Vikas Aghadi in the Maharashtra assembly elections 2024)

ADVERTISEMENT

शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याशिवाय सामोरे जाणे, हे धोक्याचे आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तुम्हाला तसे वाटते का? विधानसभेला एखादा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणे गरजेचे आहे का?, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. 

शरद पवारांनी काय दिले उत्तर?

उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "असे आहे की, आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. त्यात कुणीतरी व्यक्ती... याचा संबंध नाही. सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कोणती कागदपत्रे हवी?

त्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात का? असा प्रतिप्रश्न त्यांना विचारण्यात आला. उत्तर देताना पवार म्हणाले, "सांगितलं ना... सामूहिक नेतृत्व."

आमची अजून चर्चा नाही, विधानसभा निवडणुकीबद्दल पवार काय बोलले?

विधानसभा निवडणुकीची काय तयारी सुरू आहे, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, "असे आहे की, आमची अजून काही चर्चा नाही. आम्ही असं ठरवले आहे की, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील पक्ष असे आम्ही तिघे जण एकत्र बसून, याचा निर्णय घेणार आहोत."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री होणार? भाजपचं काय ठरलं?

"त्या बैठकीत माझी सूचना अशी राहणार आहे की, कालची जी निवडणूक झाली यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट, आप या लोकांनी आम्हाला मदत केली. आम्ही तिघे बसणार असलो, तरी डाव्या विचारसरणीचे जे घटक आहेत, जे मोदी सरकारच्या विरोधी आहेत, त्यांनाही बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न राहील", अशी माहिती पवार यांनी दिली.

ADVERTISEMENT

 

"आमची चर्चा झाल्यानंतर जागांचं वाटप झाल्यावर तो तो पक्ष त्यांच्या सहकाऱ्यांना, संघटनेला विश्वासात घेऊन त्यांचे निर्णय घेतील", असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT