Eknath Shinde Mumbaitak Baithak 2024 : लोकसभा खडतर होती की आता विधानसभा असणार? मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
Eknath Shinde Mumbaitak Baithak 2024 : विरोधकांना विधानसभेची चिंता लागलीय म्हणून तर ते लाडक्या बहिणींच्या मागे लागलेत. लाडक्या बहिणींना 1500 रूपयात विकत घेतायत? भीक देतायत? हा लाडक्या बहिणींचा अपमान आहे. म्हणून आता लाडक्या बहिणी सावत्र भावाला बरोबर बरोबर जागा दाखवतील, असा हल्ला शिंदेंनी महाविकास आघाडीवर केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधानसभेतही आम्हाला चिंता करायची गरज नाही
लोकसभेत सगळे एकत्र आले पण ते मोदींना हटवू शकले नाही.
चिंता आता विरोधकांना करावी लागणार आहे.
Eknath Shinde Mumbaitak Baithak 2024 :लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली होती.आता विधानसभेत महायुतीचं काय होणार यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई Tak बैठकीत (Mumbaitak Baithak 2024) मोठं विधान केले आहे. ''लोकसभेत सगळे एकत्र आले पण ते मोदींना हटवू शकले नाही. आणि मोदी पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसले.त्यामुळे विधानसभेतही आम्हाला चिंता करायची गरज नाही. आता चिंता विरोधकांना असेल'', मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. (eknath shinde at mumbaitak baithak 2024 on vidhan sabha election shiv sena ubt udhhav thackeray maharashtra politics)
मुंबई Tak बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ''50-60 वर्षात काँग्रेस जे करू शकली नाही ते मोदींनी 10 वर्षात करून दाखवलं. जनतेचा आमचा विश्वास होता. त्यामुळे सगळे विरोधक एकत्र येऊन देखील ते मोदींचा पराभव करू शकले नाही.मी नेहमी सांगतो, मोदींना हटवण्यासाठी सगळे एकत्र आले, पण मोदी काय हटले नाही ते पुन्हा पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसले. त्यामुळे तुम्ही मोदींच्या विजयाचे पेढे वाटताय, की तुमच्या पराभवाचे पेढे वाटताय,असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना केला. तसेच इतकं सगळ करूनही जनतेने त्यांना पुन्हा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसवलं. त्यामुळे आता विधानसभेतही आम्हाला चिंता करायची गरज नाही.चिंता आता विरोधकांना करावी लागेल'', असे मु्ख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले
''विरोधकांना विधानसभेची चिंता लागलीय म्हणून तर ते लाडक्या बहिणींच्या मागे लागलेत. लाडक्या बहिणींना 1500 रूपयात विकत घेतायत? भीक देतायत? हा लाडक्या बहिणींचा अपमान आहे. म्हणून आता लाडक्या बहिणी सावत्र भावाला बरोबर बरोबर जागा दाखवतील'', असा हल्ला शिंदेंनी महाविकास आघाडीवर केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sunil Shukre at Mumbai Tak Baithak 2024: ओबीसीतून आरक्षण मागणाऱ्यांनी राज्यघटनेचा अभ्यास करावा...: सुनील शुक्रे
लाडकी बहीण कुणाची कल्पना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "आम्ही महायुती म्हणून काम करतोय. कल्पना कुणाच्याही डोक्यात आली, तरी एकत्र निर्णय घेतो.सात-आठ महिन्यापूर्वी ही कल्पना आली. आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला. जनतेच्या हितासाठी आम्ही टीम म्हणून काम करतोय. श्रेय घेण्याचं काय? सरकार म्हणून ती जबाबदारी आहे आमची."
"कोट्यवधी रुपयात खेळणार लोकांना १५०० रुपये कमी वाटतात. पण, आम्ही देत आहोत तर तुम्ही खोडा का घालत आहात. कुणीतरी कोर्टात गेले. म्हणजे तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. माझ्या बहिणी सर्वसामान्य आहेत. त्यांना सगळ्या खर्चाचा ताळमेळ बसावा लागतो. आम्ही त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. माझी सख्खी बहीण एक आहेत. आता लाखो करोडो बहिणी आहेत. मा त्या बहिणींना सांगतोय की या सावत्र भावांपासून सावध रहा", असे म्हणत शिंदे विरोधकांवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
"आम्ही निवडणुका डोळ्यासमोर काम केलेले नाही. आम्ही पूर्वीपासून काम करत आहोत. काही जण घोषणा करतात, नंतर सांगतात की प्रिंटिंगमध्ये चूक झाली. आमचे तसे नाही", असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना लक्ष्य केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT