Mumbai Weather Updates: मुंबईकरांनो, घरीच थांबा! पुढील काही तास तुफान पाऊस
Mumbai Weather Forecast : मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांना पावसाने तडाखा दिला. मुंबईला लागून असलेल्या ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्येही मुसळधार पाऊस झाला असून, पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईमध्ये २२ जुलै रोजी हवामान कसे असेल?
हवामान विभागाने मुंबईला काय दिला आहे इशारा?
ठाणे, पालघर जिल्ह्यात पाऊस कसा असेल?
Mumbai Rains Updates News: शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी (२१ जुलै) दिवसभर कायम राहिला. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचे नाले झाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर कायम असून, पुढील काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. (IMD Alert Heavy To very heavy Rainfall in Mumbai)
ADVERTISEMENT
रविवारी मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागातील रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांबरोबरच पायी जाणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागला.
मुंबईत २२ जुलैला कसे असेल हवामान?
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणाबरोबरच मुंबईत पावसाचा जोर वाढलेला असून, पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची धार कायम राहण्याचा अंदाज आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> “मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही...”, प्रसाद लाडांचा जरांगेंना मोठा प्रस्ताव
गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. काही भुयारी मार्गात पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक मार्गातही बदल केले गेले आहेत. पाऊस अखंड सुरू असल्याने मुंबई पोलिसांनीही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
हेही वाचा >> ''शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे सुत्रधार'', अमित शाहांची बोचरी टीका
ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि लगतच्या परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवलेला असून, पुढील २४ तासांसाठी अलर्टही दिला आहे.
ADVERTISEMENT
रविवारी, २१ जुलै ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाने अक्षरशः धुडगूस घातला. दिवसभर अतिमुसळधार पाऊस सुरूच होता. त्यामुळे नवी मुंबईतील अनेक रस्त्यांना कालव्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी वाहतून मंदावली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT