Mumbai Local Train Update : मध्य रेल्वे, हार्बर लाईनवरील लोकल सेवा सुरु झाली का? मोठी अपडेट
Mumbai Rains Live : मागील काही तासांत मुंबई आणि एमएमआरडीए भागात झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई लोकल सेवा ठप्प झाली असून, ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचा...
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी
मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत
मध्य आणि हार्बर लाईनवरून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल बंद
Mumbai Rains Updates, Mumbai Local Train live News : पहिल्याच पावसाने मुंबईतील लोकल सेवेला ब्रेक लावला आहे. अनेक ठिकाणी रुळावर पाणी आल्याने मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवेवर परिणाम झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लोकल सेवा सुरू झाली असून, मध्य रेल्वेने महत्त्वाची अपडेट दिला आहे. (Mumbai Local Trains Service Latest Update)
ADVERTISEMENT
पहिल्याच पावसाने मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्याला झोडपून काढले. मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले, तर काही ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले.
मुंबई लोकल सेवेला ब्रेक
मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवेला फटका बसला. सोमवारी सकाळपासूनच कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी लोकल सेवा कोलमडून पडली. त्याचबरोबर पनवेलकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल सेवेलाही पावसाचा फटका बसला.
हे वाचलं का?
चेंबूर, टिळकनगर, चुनाभट्टीसह या भागात रेल्वे रुळ पावसाच्या पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. पनवेल ते वाशी इथपर्यंतच लोकल सोडण्यात आल्या. त्यामुळे पनवेलकडून मुंबईकडे निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले.
ADVERTISEMENT
भांडूप रेल्वे स्थानकामध्ये पावसाचे पाणी भरल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. कल्याण दिशेकडून येणाऱ्या लोकल ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत धावत होत्या.
ADVERTISEMENT
Mumbai Local Trains Latest Update : आता परिस्थिती काय?
रविवारी (8 जुलै) सकाळपासून पावसाने वेठीस धरलेली मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा अखेर पूर्वपदावर आली आहे. लोकल रेल्वे सेवा रुळावर आली असून, मध्य रेल्वेने याबद्दल माहिती दिली आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली/कसारा अप आणि डाऊन मार्गावरील सेवा सुरळीत सुरू झाली आहे.
हार्बर लाईनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/गोरेगाव लोकल सेवा सुरू झाली आहे. त्याचबरोबर ट्रान्स हार्बर म्हणजेच ठाणे ते वाशी आणि पनवेल लोकल रेल्वे सेवाही सुरू झाली आहे. बेलापूर/नेरूळ ते खारकोपर मार्गावरील लोकल सेवाही सुरळीत झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे गरज असेल तरच रेल्वेचा प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
पनवेल ते वाशी सुरू होती लोकल सेवा
पावसामुळे हार्बर लाईनवर अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी आले होते. चेंबूर, टिळकनगर, कुर्ला, चुनाभट्टी या स्थानकांदरम्यान, प्रचंड पाणी साचले होते. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी लोकल रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती.
पंप लावून साचलेले पाणी उपसण्यात आले. पाण्याचा निचरा झाल्यानंतर धिम्या मर्यादीत वेगाने लोकल सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता लोकल सेवा पूर्वपदावर आली आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने लोकलचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT