Mumbai Weather : मुंबईकरांना पाऊस धरणार वेठीस! IMD कडून तुफान पावसाचा इशारा

मुंबई तक

Mumbai Weather Forecast for 4 August 2024 : मुंबईकरांची रविवारीची सुट्टी पावसात वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

ADVERTISEMENT

मुंबईमध्ये ४ ऑगस्ट रोजी तुफान पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत रविवारी, ४ ऑगस्ट रोजी हवामान कसे असेल?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईसाठी पुढील 48 तास महत्त्वाचे

point

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

point

मुंबईसह ठाणे, पालघर पुण्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Mumbai Weather Updates : पुढील 48 तासांत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे. भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, या काळात वाऱ्याचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऐन रविवारी घरातच सुट्टी घालवावी लागणार अशीच स्थिती आहे. शनिवारपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. (IMD issues Orange alert for Mumbai, thane. red alert for palghar)

अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्ती वाऱ्यांमुळे पुढील 48 तासांत मुंबई आणि महाराष्ट्रातील पश्चिम घाटालगतच्या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

हेही वाचा >> "उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा...", फडणवीसांनी सोडला बाण

भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी कऱण्यात आला असून, पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबईत पावसाचा जोर वाढणार

शनिवारपासूनच (३ ऑगस्ट) मुंबईवर ढंगाची गर्दी झाली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. त्यानंतर अधून मधून मुसळधार सरी बरसल्या. शहर आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

हेही वाचा >> यशश्रीची ज्या कोयत्याने केली हत्या, तो कुठे सापडला? 

पुढील 48 तासांत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. महत्त्वाचे म्हणजे वेगाने वारे वाहणार असून, त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांची फजिती होण्याची शक्यता आहे. 

पुणे, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाने पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत तुफान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

Mumbai Weather update News
मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल, याबद्दल हवामान विभागाचा अंदाज.

नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही काही जिल्हे आणि संपूर्ण विदर्भामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp