एग्जिट पोल

Worli Accident : मुंबईत कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; शिवसेना नेत्याचा मुलगा फरार

मुंबई तक

ADVERTISEMENT

वरळीत कारने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू.
मुंबईतील वरळी भागात कारने दुचाकीला जोराची धडक दिली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वरळीत बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला उडवले

point

कोळीवाड्यातील महिलेचा मृत्यू

point

शिंदेंच्या शिवसेना नेत्याचा मुलगा फरार

Worli Accident : (दिपेश त्रिपाठी, मुंबई) मुंबईतील वरळी रविवारी (७ जुलै) भागात हिट अॅण्ड रनची घटना घडली. बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला जोराची धडक दिली. काही अंतरापर्यंत दुचाकी फरफट नेली. यात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. ज्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली, त्या गाडीत शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह आणि चालक होता. दोघेही फरार असून, पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे. (A woman was killed when a BMW car collided with a two-wheeler In worli, mumbai)

वरळीतील अॅटरिया मॉलजवळ ही घटना घडली. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे कावेरी नाकवा या पतीसोबत सकाळी मासे लिलावासाठी ससून डॉकला गेल्या होत्या. 

हेही वाचा >> मुंबईत 1 कोटीचा फ्लॅट, ऑडी कार..., अट्टल चोराची लाईफस्टाईल पाहून पोलीस थक्क!

दुचाकीला धडक महिलेचा मृत्यू

मासे घेऊन दुचाकीवरून परत येत असताना नाकवा दाम्पत्याच्या दुचाकीला कारने धडक दिली. गाडीवर भरपूर ओझे असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दोघेही पती पत्नी बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर आदळले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

व्हिडीओ बघा

हेही वाचा >> महायुती विधानसभेच्या किती जागा जिंकणार? फडणवीसांनी थेट आकडाच सांगितला 

पतीने प्रसंगावधान राखत लगेच गाडीच्या बाजूला उडी मारली. मात्र महिलेला बाजूला होता आले नाही. त्यातच घाबरलेल्या चालकाने गाडी जोरात पळवली. बोनेटवर पडलेली महिला दूरपर्यंत फरफटत नेली. यात महिला गंभीर जखमी झाली. महिलेला मुंबईतील नायर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. 

गाडीत शिवसेना नेत्याचा मुलगा

घटनेनंतर कार चालक फरार झाला. समोर आलेल्या माहितीनुसार कारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरमधील पदाधिकारी राजेश शाह यांचा मुलगा आणि चालक होता. दोघेही फरार असून, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी राजेश शाह यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT