Worli Accident : साडी अडकली तरी थांबला नाही; शिवसेना नेत्याचा मुलगा नंतर...

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवसेना उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह फरार आहे.
मुंबईतील वरळीमध्ये शिवसेना नेत्याच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वरळी परिसरात शिवसेना नेत्याच्या गाडीने महिलेला उडवले

point

कोळीवाडा परिसरातील कावेरी नाकवा महिलेचा मृत्यू

point

शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह फरार

Worli Accident Mihir Rajesh Shah : मुंबईतील वरळी भागात असलेल्या अटरिया मॉलजवळ पहाटे भीषण अपघात झाला. यात महिलेचा मृत्यू झाला. या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणाने मुंबईत खळबळ उडाली आहे. ज्या कारने महिलेला उडवले, त्या कारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा मुलगा आणि चालक होता. धडक दिल्यानंतर महिलेची साडी कारमध्ये अडकली, मात्र कार थांबवली नाही. महिलेला तसेच फरफटत नेले. यात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Shiv Sena Leader Rajesh Shah Son Mihir Shah has Absconded after accident)

दुचाकीवरून घरी जात असलेल्या एका दाम्पत्याला एका बीएमडब्ल्यू कारने जोराची धडक दिली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. 

वरळी अपघात : पहाटे साडेपाच वाजता काय घडलं?

मुंबईतील वरळीत अटरिया मॉल आहे. याच मॉलजवळ हा भीषण अपघात झाला. वरळी कोळीवाडा परिसरातील रहिवाशी कावेरी नाकवा या पतीसह दुचाकीवरून मासे लिलावासाठी ससून डॉकला गेल्या होत्या. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मासे घेतल्यानंतर दोघे दुचाकीवरून परत येत होते. मॉलजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. खूप सामान आणि मासे असल्याने दुचाकीचा तोल गेला आणि  दोघेही बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर पडले.

हेही वाचा >> एकनाथ शिंदे ओबीसी मुद्द्यावरून सापडले खिंडीत? 

कावेरी नाकवा यांच्या पतीने क्षणार्धात बोनेटवरून बाजूला उडी मारली. पण, कावेरी नाकवा यांना बाजूला होता आले नाही. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कावेरी नाकवा यांची साडी कारमध्ये अडकली होती. त्यामुळे त्यांना बाजूला पडताच आले नाही. मिहीर शाह याने कार तशीच सुसाट पुढे नेली. कावेरी याही कारबरोबर फरफटत गेल्या आणि जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

शिवसेना नेत्याचा मुलगा कुठे गेला?

मिहीर शाह हा शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. अपघातानंतर मिहीर शाह पळून गेला. अशी माहिती समोर आली आहे की, मिहीर शाह हा अपघातानंतर गोरेगावला गेला.

हेही वाचा >> ''युतीमध्ये तडजोड करावी लागते'', फडणवीस असं का म्हणाले? 

गोरेगावला मिहीर शाह त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला. त्यानंतर सकाळी आठ वाजता वांद्र्याला मित्रांकडे चाललो असे सांगून तो गर्लफ्रेंडच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने मोबाईल बंद करून टाकला. सध्या पोलीस मिहीर शाह याचा शोध घेत आहेत. 

मनसे, शिवसेना UBT आक्रमक

या घटनेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला. ही दुर्दैवी घटना असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी आणि कुणाला सोडू नये. न्याय मिळाला पाहिजे. मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. महिलेची साडी कारमध्ये अडकली आणि तिला ३ ते ४ किमी फरफटत नेले, असे देशपांडे यांनी सांगितले.

 

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही यावर टीका केली आहे. "मुंबईतल्या वाहनचालकांची ड्रायव्हिंगची पद्धत आणि शिस्त ह्यावर आम्ही सातत्याने बोलत आलोय. उलट दिशेने गाड्या चालवणं, सिग्नल न पाळणं, ट्रिपल सीट जाणं... सगळंच मुंबईत वाढत चाललंय जे आधी नव्हतं! पण आता तर हिट ॲंड रन सारखे प्रकार घडायला लागलेत! अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला जरी तातडीने अटक करण्यात आली असली, तरी अशा घटना होऊच न देणं गरजेचं आहे. त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन ही परिस्थिती आपल्याला सुधारायला लागेल! मुंबईची वाहतुक शिस्त आणि सुरक्षा परत आणायला लागेल! वाहतुकीचे नियम पाळले जातील, वाहकांना शिस्त लागेल आणि चूका करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, ह्याची काळजी घ्यावी लागेल!", असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT