घृणास्पद… कुत्र्यावर बलात्कार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Person Raping a Dog incident caught on CCTV: पाटणा: बिहारच्या (Bihar) राजधानी पाटणामधील (Patna) फुलवारीशरीफ परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका अज्ञात व्यक्तीने भटक्या कुत्र्यावर (Dog) बलात्कार (Rape) केल्याचं समोर आलं आहे. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या आधारे स्थानिक स्वयंसेवी संस्थेने फुलवारीशरीफ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, असं घृणास्पद कृत्य करणारा आरोपी अद्याप फरार आहे. ज्याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. (bihar dog rape incident caught on cctv police registers fir)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

फुलवारीशरीफच्या फैजल कॉलनीतील मुस्लिमबहुल पोथिया मार्केटमध्ये होळीच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. एक अज्ञात व्यक्ती एका श्वानावर लैंगिक अत्याचार करत होता. ज्याचा व्हिडिओ स्थानिक सोशल मीडिया चॅनेलवर व्हायरल झाला. जो पाहून सगळेच हैराण झाले. याप्रकरणी लोकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे.

एएसपी यांनी दिला या प्रकरणाला दुजोरा

या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. यानंतर फुलवारीशरीफ पोलीस ठाण्यात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेची पुष्टी करताना फुलवारीशरीफचे एएसपी मनीष यांनी सांगितले की, ‘औपचारिक जबाब जारी करण्यापूर्वी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.’ त्यांनी संबंधित विभागांशी चर्चा केली आणि या प्रकरणात नेमकी कोणाची चौकशी केली जात आहे याचीही माहिती दिली. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

शेजाऱ्याच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार, आरोपीची बायको शूट करत होती VIDEO

दिल्लीत कुत्र्यावर बलात्कार, आरोपीला अटक

प्राण्यांच्या क्रूरतेचे हे प्रकरण नवीन नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीतही अशीच एक घटना समोर आली होती. हरी नगरपाठोपाठ आता इंद्रापुरी परिसरात कुत्र्यासोबत बलात्काराची घटना समोर आली आहे. इंद्रापुरीच्या जेजे कॉलनीत एका व्यक्तीने कुत्र्याला आपल्या वासनेचा शिकार बनवलं होतं. आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटकही केली होती.

ADVERTISEMENT

Washim: तपासादरम्यान पोलिसांचा कुत्रा भुंकला आणि बिंग फुटलं, वडिलांची हत्या करणारा मुलगा अटकेत

ADVERTISEMENT

येथे राहणाऱ्या राजेश नावाच्या व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, ‘माझ्या घराजवळ राहणारा सतीश नावाचा व्यक्ती हा व्यसनाधीन आहे. 28 फेब्रुवारी रोजी मला कुत्र्याचा रडण्याचा आवाज आला. जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा मला सतीश कुत्र्यावर बलात्कार करताना दिसला. मी तात्काळ त्याचा व्हिडीओ बनवून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.’ दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सतीशला अटक केली.

दरम्यान, अशाप्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे अशा कृत्यांना चाप बसावा यासाठी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी प्राणीमित्र संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

19 वर्षाच्या मुलीने केलेला 15 वर्षाच्या मुलावर बलात्कार, कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT