‘संजय शिरसाठ गोव्यात सव्वा कोटी गमावले”, चंद्रकांत खैरेंची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

'संजय शिरसाठ गोव्यात पत्यामध्ये सव्वा कोटी हारले'', चंद्रकांत खैरेंची टीका
'संजय शिरसाठ गोव्यात पत्यामध्ये सव्वा कोटी हारले'', चंद्रकांत खैरेंची टीका
social share
google news

Chandrakant Khaire Criticize Sanjay Shirsat : शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंविरोधात (Sushama Andhare)विधान करताना ‘लफडी’ या शब्दाचा वापर केला होता. या एका ‘लफडी’ शब्दावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे. तर आता ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीकेची तोफ डागलीय. संजय शिरसाट गोव्याला जाऊन पत्यात सव्वा कोटी रुपये हारलेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.या टीकेवर आता संजय शिरसाठ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(chandrakant khaire criticize sanjay shirsat lost half a crore in gambaling in goa sushma andhare case)

ADVERTISEMENT

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) गोव्याला जाऊन पत्यात सव्वा कोटी हारले. याचा त्याला गम नाही. हे सगळं संभाजी नगरच्या मतदारांना माहित असल्याची टीका चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केली आहे. तसेच मी अडीच हजार फोन करून संजय शिरसाठ यांना निवडून आणले होते. यावेळी लोक मला म्हणायची, आम्ही त्याला मतदान करणार नाही. तो मुंबईला 5-5 दिवस पडून असतो. पण मी नागरीकांना समजावलं. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आहे, एका-एका आमदारांची गरज आहे. अशाप्रकारे मी त्याला निवडून आणलं होतं, असा किस्सा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सांगितला.

हे ही वाचा : Sanjay Shirsat यांनी लावली आमदारकी पणाला; सुषमा अंधारेंना दिलं आव्हान

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आता फुटले आहेत. मंत्री पद मिळाले नसल्याने ते आता जास्त बडबड करायला लागलेत,जास्त बडबड केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे त्यांना मंत्रिपद देतील. पण आता काही होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागणार आहे,मग पहा हे कुठे जातील अशी टीका देखील चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

“ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार, भुमरे माझेच भाऊ, काय-काय लफडी केली आहे, तिलाच माहिती. आम्ही आमची 38 वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या एका सभेत दिली होती. या त्यांच्या विधानानंतर सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी ”लफडी” या शब्दावर आक्षेप घेत टीका केली होती. संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आणि बहीण-भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी भाषा आहे, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

हे ही वाचा : शिंदे, फडणवीस, मी अन् 150 बैठका; सत्तांतराबद्दल तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट, महाराष्ट्रात खळबळ

सुषमा अंधारे (Sushama Andhare) चावी दिल्यासारख्या बोलत आहेत, माझा भाऊ, माझा भाऊ, म्हणतं आमच्यावर जी टिका करत आहेत त्या माफ करायच्या का? मी काय चुकीचे बोललो आहे? त्यातील एखादं वाक्य दाखवा की त्यात त्यांची मानहानी करणारं आहे. मी जर काही अश्लील बोललो असेन तर तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन,असे आव्हानच त्यांनी सुषमा अंधारेंना दिले होते.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT