Vinod Kambli Admitted in Thane Hospital: विनोद कांबळी यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक
विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विनोद कांबळीला रुग्णालयात करण्यात आलं दाखल

point

अचानक खालावली विनोदची प्रकृती

point

मागील अनेक दिवसांपासून विनोद कांबळी आजारी

Vinod Kambli Admitted in Thane Hospital: ठाणे: माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावली आहे. तसंच त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे कांबळीला ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (former indian cricketer vinod kamblis health deteriorated admitted to thane hospital)

ADVERTISEMENT

शनिवारी कांबळीची प्रकृती खूपच खालावली होती. त्याच दिवशी त्याला तातडीने ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण आता तीन दिवस उलटून गेल्यावरही त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा नसल्याचं समोर आलं आहे. सध्या कांबळीची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचं समजतं आहे.

अशी होती कांबळीची क्रिकेट कारकीर्द 

भारतीय संघाचा क्रिकेटपटू विनोद कांबळी हा काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरसोबत एका जाहीर कार्यक्रमात दिसला होता. ज्याचे अनेक व्हिडिओ हे व्हायरल झाले होतो, ज्यामध्ये तो सचिनला त्याच्या बाजूला बसण्यास सांगत होता.

हे ही वाचा>> Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली, पण कपिल देव म्हणाले..

दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याचं काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्क येथे अनावरण करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात सचिन आणि विनोदची भेट झाली होती. या कार्यक्रमातच कांबळीची प्रकृती ठीक नसल्याचं दिसून आलं होतं. जेव्हा कांबळीचा तेंडुलकरसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. 

दरम्यान, यानंतर कपिल देव यांनी विनोद कांबळीच्या आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक मदत करण्यात तयार असल्याच सांगितलं होतं. मात्र, आता विनोदच्या चाहत्यांसाठी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. कांबळीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत असून आवश्यक सर्व चाचण्या केल्या जात आहेत.

ADVERTISEMENT

वयाच्या 52 व्या वर्षी विनोद हा अत्यंत वयस्कर असा व्यक्ती दिसत होता. त्याला या स्वरुपात पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली, पण कपिल देव म्हणाले..

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे शिवाजी पार्कमध्ये प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र क्रिकेट खेळायचे. कांबळीने 1991 मध्ये टीम इंडियासाठी वनडे पदार्पण केले होते, तर 2000 मध्ये तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. 2009 मध्ये कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं, तर 2011 मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली.

कांबळी हा भारतासाठी केवळ 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला. स्टायलीश डावखुरा फलंदाज असलेल्या कांबळीने कसोटीत 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या, ज्यात चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या. कांबळीने एकदिवसीय सामन्यात दोन शतके आणि 14 अर्धशतके झळकावली.

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT